शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांच्या भूमीत मराठ्यांची वज्रमूठ

By admin | Updated: September 26, 2016 17:08 IST

कोपर्डी घटनेचा जाहीर निषेध करीत आणि असंतोषाचा आक्रोश मौनातून व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाचा लाखोंचा जनसागर पोहचला

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 26 - बाल शहिदांच्या भूमीत सोमवारी मराठा समाजाचा जनसागर उसळला. कोपर्डी घटनेचा जाहीर निषेध करीत आणि असंतोषाचा आक्रोश मौनातून व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाचा लाखोंचा जनसागर पोहचला. मोर्चातील जिजाऊच्या सहा लेकींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी आणि त्यातील नराधामांना तातडीने शिक्षा करण्यासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे सोमवार, २६ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चासाठी सकाळी नऊ वाजेपासूनच हजारो समाजबांधव विविध वाहनांनी नंदुरबारात दाखल होत होते. दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास सहा तरुणींनी पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चातील मार्गावर असलेल्या पालिकेतील शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळला, पंडित नेहरू, म.गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोर्चाचे पहिले टोक ते शेवटचे टोक असे जवळपास अडीच ते तीन किलोमिटरचे लांब अंतर होते. मोर्चेकरी महिला, तरुण, तरुणी, वृद्ध यांच्या हातात निषेधाचे काळे झेंडे, भगवे झेंडे, विविध घोषणा लिहिलेले फलक होते. नि:शब्द हुंकार व्यक्त करीत दुपारी दोन वाजता मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले. अडीच वाजता जिल्हाधिकाऱ्यांना सहा तरुणींनी निवेदन दिले. त्यानंतर पावणेतीन वाजता आठ फूट उंचीच्या व्यासपीठावरून पाच तरुणींनी निवेदन वाचण्यास सुरुवात केली. सर्वात आधी कोपर्डीच्या मुलीची आत्मकथा, नंतर मराठीतून व त्यानंतर अहिराणीतून निवेदनाचे वाचन करण्यात आले. उपस्थितांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.