करणीच्या संशयावरून मांत्रिकाचा खून

By Admin | Updated: March 1, 2015 01:27 IST2015-03-01T01:27:56+5:302015-03-01T01:27:56+5:30

मुलाला करणी केल्याच्या संशयावरून एका मांत्रिकाला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून खांबाला बांधून ठेवण्यात आले.

Mantle blood on suspicion of duty | करणीच्या संशयावरून मांत्रिकाचा खून

करणीच्या संशयावरून मांत्रिकाचा खून

पुसद (यवतमाळ) : मुलाला करणी केल्याच्या संशयावरून एका मांत्रिकाला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून खांबाला बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर विष पाजून त्याचा खून करण्यात आला. ही घटना यवतमाळ जिल्ह्णाच्या पुसद तालुक्यातील वेणी खुर्द गावात शुक्रवारी रात्री घडली.
माधव लक्ष्मण खंदारे (५५) रा. वेणी खुर्द असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी पार्वतीबाई यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी आठ जणांविरुद्ध खून, अ‍ॅट्रोसिटी व जादुटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये इस्माईल खान मनवर खान, उस्मान खान मनवर खान, इब्राहिम खान मनवर खान, आलम खान उसमान खान, अमजद खान नामदार खान, नाजीर खान नामदार खान, सलमान खान इब्राहीम खान आणि जमीर खान यांचा समावेश आहे. यातील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुसदपासून उमरखेड मार्गावर दहा किमी अंतरावर वेणी खुर्द गाव आहे. या गावात
कथित मांत्रिक माधव खंदारे राहात होता. इब्राहीन खान मनवर खान यांचा मुलगा सलमान खान याच्यावर माधवने करणी केल्याचा संशय
आहे. या करणीमुळेच तो नेहमी आजारी राहतो, असा त्याच्या पालकांचा दावा आहे. याच कारणावरून शुक्रवारी रात्री ९.३० वाजता माधव याला इसमाईल
खान व साथीदारांनी घराबाहेर बोलविले. त्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करीत लोखंडी खांबाला बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला बळजबरीने विष पाजण्यात आले. आरडाओरड ऐकून गावकरी गोळा झाल्याने माधवला सोडून देण्यात आले. मात्र रात्री माधवचा मृत्यू झाला. पोलिसांनी
आठ जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला
आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Mantle blood on suspicion of duty