मनेका अक्का, ग्रेसी आण्टी गजाआड

By Admin | Updated: June 22, 2015 03:31 IST2015-06-22T03:03:37+5:302015-06-22T03:31:13+5:30

मालाड मालवणीमधील दारूकांडातील बळींचा आकडा आज सायंकाळपर्यंत ९७वर पोहोचला. आहे. अजूनही ४६हून अधिक जखमींवर मुंबईतील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

Maneka Akka, Gracie Autee Gajaad | मनेका अक्का, ग्रेसी आण्टी गजाआड

मनेका अक्का, ग्रेसी आण्टी गजाआड

मुंबई : मालाड मालवणीमधील दारूकांडातील बळींचा आकडा आज सायंकाळपर्यंत ९७वर पोहोचला. आहे. अजूनही ४६हून अधिक जखमींवर मुंबईतील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
यापूर्वी गुन्हे शाखेने दारुकांडाप्रकरणी सलीम मेहबूब शेख उर्फ जेंटल (३९) आणि फ्रान्सिस थॉमस डिमेलो (४६) या दोन मुख्य आरोपींसह राजू हणमंता पास्कल उर्फ राजू लंगडा (५०), डोनाल्ड रॉॅबर्ट पटेल (४७) आणि गौतम हारटे (३०) यांना अटक केली. या आरोपींना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ममता राठोड (३०) उर्फ ममता आण्टी, मनेका
अक्का आणि अ‍ॅग्नेस ग्रेसी उर्फ ग्रेसी आण्टी (५०) यांना अटक करण्यात आली.
या दुर्घटनेस जबाबदार ठरवत मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांसह आठ पोलिसांवर शुक्रवारी तर उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकासह चार जणांवर शनिवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
कलमांत वाढ
या प्रकरणी गुन्हे शाखेने १२० ब (कट रचणे) आणि २०१ (पुरावे नष्ट करणे) या दोन भादंवि कलमांची वाढ केली. या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली. यातील आरोपी गौतम हरटे याने दारूचा पुरवठा केल्याचे तपासात समोर आले.

Web Title: Maneka Akka, Gracie Autee Gajaad