शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनाली- लेह- श्रीनगर रस्ता सायकलवरुन पूर्ण

By admin | Updated: September 4, 2015 22:36 IST

नेहमीच्या धकाधकीच्या जीवनापासून काही दिवस का होईना आपली सुटका करुन घेण्यासाठी त्याने निसर्ग भ्रमंतीची ही अनोखी आणि जोखमीची सायकल मोहीम आखली

महादेव भिसे -- आंबोली   --जिथे जाणं हेच लोकांसाठी धाडसाचं काम आहे. जिथे रस्ता हा फक्त दिशा दाखवायचं काम करतो, जिथे रस्त्यावर डांबर नावाचा प्रकार मुळीच नाही, जिथे मोटारसायकल चालवायची म्हटली तर चालक आणि मोटारसायकल या दोघांची कसोटी लागते, जिथे श्वास घ्यायचा म्हटला तर आॅक्सिजन अपुरा पडतो, जिथे स्वत:ला काही झालं तर डोंगर आणि रस्ता यांची साथ सोडली तर दुसरं कुणीच नाही. अशा प्रदेशामध्ये एका युवकाने चक्क सायकलवरुन प्रवास केला आहे. जगातील सर्वात उंच व तेवढाच अवघड समजला जाणारा मनाली - लेह - श्रीनगर रस्ता एकट्याने सायकलवरुन पूर्ण करण्याचे धाडस केले आहे आंबोलीतील २४ वर्षीय युवक अभिषेक नार्वेकर याने. अभिषेक नार्वेकर हा मुळचा आंबोलीचा परंतु, गेली तीन वर्षे तो कामानिमित्त पुणे येथे राहतो. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनापासून काही दिवस का होईना आपली सुटका करुन घेण्यासाठी त्याने निसर्ग भ्रमंतीची ही अनोखी आणि जोखमीची सायकल मोहीम आखली. अभिषेक एक स्वप्न म्हणून या मोहिमेकडे बघत होता. या संपूर्ण सायकलींग टूरमध्ये अभिषेकने जवळपास १००० कि. मी.हून अधिक अंतर सायकलने पूर्ण केले. हा प्रवास पूर्ण करायला त्याला २३ दिवस लागले. त्यात १७ दिवस त्याने प्रत्यक्षात रस्त्यावर सायकल चालविली. यामध्ये बाईकींगसाठी जगातील सगळ्यात उंच समजल्या जाणाऱ्या पास (खारदुग्ला) चाही समावेश आहे. अभिषेकला या टूरसंदर्भात एकंदरीत आलेला अनुभव त्याने रोमांचकरित्या कथन केला. तो म्हणाला की, हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद खूप मोठा होता. परंतु, त्यासाठीची मेहनतही तितकीच मोठी होती. वेळ, काम आणि सराव या तिन्हींचा ताळमेळ घालणे ही मोठी परीक्षा होती. मोहिमेस जाण्यापूर्वी सलग दोन महिने सिंहगड पायथ्यापर्यंत रोजचा सायकल प्रवासाचा सराव चालू होता. अभिषेकच्या या मोहिमेस मुंबईतील सायकलपटू सचिन गावकर यांनी रस्ता, थांबे, भोजनाच्या व्यवस्था याबद्दल माहिती दिली. मनाली ते लेह रस्ता आणि लेह ते श्रीनगर रस्ता या रस्त्यांवर सायकलिंगचा अनुभव रोमांचकारी व धाडसाचा होता, असे तो म्हणाला.