शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष माने यांचा आत्मदहनाचा इशारा

By admin | Updated: June 20, 2014 00:15 IST

जलशुध्दीकरण केंद्राचे जागा हस्तांतरणाचा प्रश्न ७ दिवसात जागा न मिळाल्यास जिल्हाधिकारी यांचे कक्षात आत्मदहन करण्याचा इशारा

खामगाव : जलशुध्दीकरण केंद्राचे जागा हस्तांतरणाचा प्रश्न राजकारणामुळे अडकलेला असून वारंवार पाठपुरावा करुनही प्रतिसाद मिळत नाही. याबाबत ७ दिवसात जागा न मिळाल्यास जिल्हाधिकारी यांचे कक्षात ठिय्या आंदोलन करुन आत्मदहन करण्याचा इशारा नगराध्यक्ष गणेश माने यांनी दिला आहे. केंद्र शासन पुरस्कृत यूआयडीएसएसएमटीयोजने अंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना मन धरणावरुन मंजूर झालेली असून या योजनेसाठी ११.६८ कोटी रुपये अतिरिक्त अनुदान राज्य शासनाने मंजूर केले आहे. या योजनेच्या मंजूर कामापैकी ७५ टक्के कामे पूर्ण झालेली असून उर्वरित कामे सुरु आहेत. वाढीव पाणी पुरवठा ही मुळ योजना ६३.६५ कोटी रुपये टेंडर किंमतीची असून केंद्र व राज्य शासनाकडून या प्रकल्पास आता पर्यंत फक्त ४४.६७ कोटी रुपये अनुदान मिळाले. सदर अनुदानातून न.प. ने स्वत:चा निधी ७.७२ कोटी असे असून एकूण ५२ कोटी रुपये खर्च झाला. योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता होती. हा निधी न.प. ला कर्जाद्वारे उभारावयाचा होता. मात्र सदर कर्जाचा भार हा दरडोई नागरिकांवर येणार होता. त्यामुळे अतिरिक्त निधीसाठी आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्ष गणेश माने यांनी मुख्याधिकारी नामवाड यांच्यावतीने पाणी पुरवठा उपअभियंता संजय मोकासरे यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर प्रश्न रेटून धरला. त्यानुसार उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील इतर नगर पालिकांच्या तुलनेत सर्वाधिक ११.६८ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहेत. हा निधी २0 मे २0१४ रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्यशासनाकडून वाढीव निधी प्राप्त झाल्याने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम योजनेमधून शाहराची वाढीव पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण प्रलंबित कामे १00 टक्के पूर्ण होऊन वाटर मिटरच्याही खर्चाची तरतूद न.प. ला करता येणार आहे. व योजनेसाठी कोणतीही कर्ज उभारणी करण्याची आवश्यकता पडणार नाही. याशिवाय न.प. खर्चाचेही परतफेडीचेही दायीत्व कमी होत आहे. तसेच वाटर मिटरचा भार नागरिकांना सोसावा लागणार नाही. मागीलवर्षी अतवृष्टीच्या पुराचे पावसाने मन धरण १00 टक्के भरल्याने धरणावरील विहिरीचे खोदकाम, बांधकाम, ब्रीज यांचे काम पाण्यात बुडाल्याने बंद झाले होते. आता धरणाची पातळी घटल्याने व सिंचनास पाणी सोडल्याने युध्द पातळीवर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच शहरातील वितरण व्यवस्थेची टेस्टींग व बुस्टर व इतर कामेही युध्दपातळीवर सुरु करण्यात आली आहे. नगर पालिका प्रशासन स्वत:च्या खर्चाने नागरिकांना जलमापक यंत्र बसवून देणार आहे. त्यामुळे खामगाव हे दिवसरात्र पाणी पुरवठा करणारे राज्यातील पहिले मध्यम स्वरूपाचे शहर ठरणार आहे.