शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं; राऊतांचं 'रोखठोक' मत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 8:22 AM

Sanjay Raut On Mamata Banerjee : ‘जय बांगला, जय मराठा!’ प. बंगालच्या वाघिणीची ही गर्जना भविष्यातील राजकारणाची नांदी आहे - राऊत  

Sanjay Raut On Mamata Banerjee : प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी पत्रकारांसमोर नारा दिला, ‘जय बांगला, जय मराठा!’ प. बंगालच्या वाघिणीची ही गर्जना भविष्यातील राजकारणाची नांदी आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.मुंबईत येऊन त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. ती भेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजारपणामुळे झाली नाही. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालात जो ‘खेला होबे’ केला, दिल्लीचा अतिरेक रोखण्याचा, तोच खेळ महाराष्ट्रात झाला. सत्ता, पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड दहशतवाद याचा पराभव प. बंगाल आणि महाराष्ट्राने केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा होता. एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यावर जातात तेव्हा फार स्वागत होत नाही. ममता बॅनर्जी त्यास अपवाद आहेत. प. बंगालातून जणू बहीणच दोन दिवसांसाठी पाहुणचारास आली, असे मुंबईकरांना वाटले, असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याचं कौतुक केलं.नातं टिकलं पाहिजेमहाराष्ट्र मंडळात आमच्या नियमित बैठका होत असतात. प. बंगालचे महाराष्ट्राशी नाते कायम टिकले पाहिजे!’’ असा आशावाद ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरेंबरोबर दिल्लीत ममता बॅनर्जी यांना भेटण्याचा योग अनेकदा येतो. मुंबईच्या ‘ट्रायडेण्ट’ हॉटेलात  आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने त्यांना भेटलो. ममता मुंबईतील उद्योगपतींना भेटण्यासाठी आल्या. उद्योगपतींनी प. बंगालात यावे हे निमंत्रण घेऊन त्या आल्या. त्यांनी उद्योगपतींची बैठक विनम्रपणे बोलावली. तेव्हा गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुंबई दौऱ्याची आठवण झाल्याचे ते म्हणाले.... त्या राज्यांचा विकास तात्पुरती सूज  मुंबईतील उद्योगपतींना गुजरातेत येण्याचे निमंत्रण घेऊन त्या आल्या व मुंबईत येऊन मुंबईचीच बदनामी करून गेल्या. ‘‘मुंबई में क्या रखा है? इथले रस्तेही खराब आहेत. तेव्हा गुजरातला चला.’’ असे निमंत्रण त्यांनी दिले. तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील विकासाचे उद्योगपतींकडे कौतुक केले व प. बंगालकडे दृष्टी वळवा, असे सांगितले. शेवटी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, पण महाराष्ट्राचीही ती राजधानी आहे. याचे भान ठेवून जे राज्यकर्ते मुंबईत उतरतात त्यांचे स्वागत आहेच. देशाचा आर्थिक भार मुंबईच्या डोक्यावर आहे. मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या राजधानीने हातभार लावला तर ते राष्ट्रीय कार्यच ठरेल, असेही राऊत यांनी आपल्या सदरात नमूद केले.ईडीचे लोक कोलकात्यात बसूनममता बॅनर्जी यांनी बंगालात प्रचंड विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाची सत्ता व मत्ता यांचा दारुण पराभव केला. एखाद्या वाघिणीसारख्याच त्या लढल्या. केंद्रातले मोदींचे सरकार कसे छळवाद करीत आहे व बंगालचे सरकार व जनता या छळवादाशी कसे नेटाने लढत आहे ते त्यांनी सांगितले. प. बंगालचे राज्यपाल रोजच अडवणुकीचे धोरण स्वीकारतात. ‘ईडी’चे पन्नास लोक कोलकात्यात बसवून ठेवले आहेत व ते मंत्री, आमदारांवर खोटे गुन्हे दाखल करतात. प. बंगालची यथेच्छ बदनामी भाजप व केंद्रीय यंत्रणा करतात, पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही. मराठा व बंगाली हे लढणारे लोक आहेत. ते मागे हटणार नाहीत, असे बॅनर्जी म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जीMaharashtraमहाराष्ट्र