शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

जळीत पुरुष रुग्णाची लाहीलाही

By admin | Updated: May 26, 2014 01:11 IST

जळालेल्या महिला आणि लहान मुलांसाठी मेडिकल रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था आहे, मात्र पुरुषांसाठी अद्यापही ही व्यवस्था नाही. त्यांना जनरल वॉर्डात इतर रुग्णांसोबतच ठेवले जाते.

मेडिकल : ६६ वर्षांंंनंतरही स्वतंत्र वॉर्ड नाही

नागपूर : जळालेल्या महिला आणि लहान मुलांसाठी मेडिकल रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था आहे, मात्र पुरुषांसाठी अद्यापही ही व्यवस्था नाही. त्यांना जनरल वॉर्डात इतर रुग्णांसोबतच ठेवले जाते. यामुळे इन्फेक्शन पसरून रुग्ण आणखी गंभीर होतो. आशिया खंडातील सर्वात मोठय़ा या रुग्णालयाला ६६ वर्षे झाली असताना शासनाच्या उदासीनतेची झळ सामान्य रुग्णांना बसत आहे. जळीत पुरुष रुग्णांची लाहीलाही कधी थांबेल, असा प्रश्न विचारला जात आहे. पेट्रोल टाकून जिवंत जाळलेल्या संजय खोब्रागडे यांना विशेष बाब म्हणून महिलांच्या जळीत वॉर्डात उपचार सुरू होते.

दिवाळी, उन्हाळ्यांच्याच दिवसांत नव्हे तर इतरही दिवसांत मेडिकलमध्ये जळालेले पुरुष रुग्ण येतात. आठवड्यातून चार-पाच रुग्ण भरती होतातच. यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड नाही. अशा रुग्णांना शस्त्रक्रिया विभागाच्या वॉर्ड क्र. ७, ९, ११ किंवा १९ मध्ये ठेवले जाते. या वॉर्डात आधीच शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेले किंवा शस्त्रक्रिया होऊन आलेले रुग्ण असतात. यात जळालेले रुग्ण ठेवले जातात. जळाल्यामुळे झालेल्या जखमांची खूप आग होते, हवेची हलकी झुळूकही या जखमांवरून गेली की वेदनेचा स्फोट होतो. यामुळे या वॉर्डात कायम किंकाळय़ा, आक्र ोश पाहायला मिळतात. अशा वेळी नातेवाइकांनाही आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत थांबणे कठीण होऊन बसते. परिचारिका आणि डॉक्टरांनाही काम करणे सोयीचे होत नाही. याचा परिणाम इतर रुग्णांवरही होतो. विशेष म्हणजे या रुग्णांना आवश्यक सोयीही येथे उपलब्ध नाही. यामुळे इन्फेक्शन पसरण्याची दाट शक्यता असते. अनेकवेळा या कारणांमुळे यांचा जीव वाचविण्यास डॉक्टरांचे प्रयत्नही अपुरे पडतात.

जळालेल्या रु ग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना कायम अतिदक्षता कक्षात ठेवावे लागते, मेडिकलमध्ये फक्त महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. या वॉर्ड क्र. ४ मध्ये २९ खाटा आहेत. येथे जळालेल्या रुग्णांसाठी आवश्यक सोयी पुरविण्यात आल्या आहेत. अशीच सोय पुरुषांसाठीही असावी, असे येथे येणार्‍या प्रत्येक रुग्णांच्या नातेवाइकांची अपेक्षा असते. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या विस्तारीत कामांमध्ये जळालेल्या पुरुषांच्या स्वतंत्र वॉर्डाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला आहे. याला दोन वर्षे होत आहे, मात्र अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. (प्रतिनिधी)