‘त्या’ प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा

By Admin | Updated: June 11, 2015 02:08 IST2015-06-11T02:08:13+5:302015-06-11T02:08:13+5:30

वडार समाजातील बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करीत ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेने बुधवारी

Make a judicial inquiry into 'that' matter | ‘त्या’ प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा

‘त्या’ प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा

मुंबई : वडार समाजातील बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करीत ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेने बुधवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. राज्यातील वडार समाजावर झालेल्या अत्याचारांच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी उपोषण केले.
नांदेड जिल्ह्यातील किनवट गावातील संजय धोत्रे या तरुणाने किनवट पोलीस यंत्रणेच्या जाचाला कंटाळून आत्मदहन केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणात पोलीस यंत्रणाच दोषी आढळल्याने आत्मदहनाची जलद गतीने न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाय वर्धा जिल्ह्यातील आर्वी नाका येथील रूपेश मुळे या लहान मुलाचा नरबळी देण्यात आला. सातत्याने वडार समाजातील बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमुळे समाजात रोष आहे. त्यामुळे राज्य सरकारने कायद्याची निर्मिती करून शासन सुनावण्याची मागणी संघटनेने केली.

Web Title: Make a judicial inquiry into 'that' matter