शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मेक इन इंडियाचा मार्ग महाराष्ट्रातूनच

By admin | Updated: February 14, 2016 00:36 IST

देशाच्या सकल उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के असून, निर्यात व थेट परकीय गुंतवणुकीतही महाराष्ट्रच देशात अव्वल आहे, असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मेक इन

मुंबई : देशाच्या सकल उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के असून, निर्यात व थेट परकीय गुंतवणुकीतही महाराष्ट्रच देशात अव्वल आहे, असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मेक इन इंडियाचा मार्ग मेक इन महाराष्ट्रद्वारेच प्रशस्त होईल, असा विश्वास आज व्यक्त केला. मेक इन इंडिया सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात फडणवीस प्रास्ताविकात म्हणाले की, या सप्ताहानिमित्त आलेल्या देशविदेशातील गुंतवणूकदारांच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे. भारत हा गुंतवणुकीसाठी जगात सर्वोत्तम असल्याचे अहवाल अनेक संस्था देत आहेत. देशात महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम असे राज्य करण्यासाठी आपल्या सरकारने पावले उचलली आहेत. मेक इन इंडियामध्ये राज्याराज्यात निकोप स्पर्धा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीने आज देशाचा एकूण विकासविषयक दृष्टिकोनच पूर्णत: बदलला आहे. मेक इन महाराष्ट्रसाठी आपल्या सरकारने ईझ आॅफ डुर्इंग बिझनेसअंतर्गत नवीन गुंतवणुकीसाठी पोषक असे वातावरण तयार केले आहे. ५० वर्षांत झाल्या नसत्या अशा बाबी आम्ही केल्या आहेत. परवाना राज संपविण्याच्या दिशेने परवान्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. एकखिडकी योजना आणली आहे. किरकोळ व्यापार धोरण, इलेक्ट्रॉनिक धोरण, पर्यटन धोरण आम्ही आणले आहे. मुंबईत बीकेसी येथे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियामध्ये झालेल्या या समारंभाला देशविदेशातील उद्योगपती, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसेच मंत्री, महाराष्ट्राचे जवळपास सर्व मंत्री, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी) स्विडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान यांनी, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या प्रक्रियेत स्विडन सोबत असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, मी आमच्याकडील उद्योगपती आणि अधिकाऱ्यांचे मोठे शिष्टमंडळ घेऊन आलो आहे. भारतातील गुंतवणूक आम्ही निश्चितपणे वाढविणार आहोत. आम्ही भारताला विश्वासू आणि दीर्घकालीन भागीदार समजतो.फिनलँड उत्सुकयुरोपचे गेट वे असलेल्या फिनलँडचे पंतप्रधान जुहा पॅट्री सिपिला यांनी भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. परवडणारी घरे, अपारंपरिक ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीवर भर असेल, असे ते म्हणाले.