शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीच्या दरोडेखोरांनी महाराष्ट्र लुटला : फडणवीस

By admin | Updated: October 10, 2014 22:55 IST

पंधरा वर्षात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पांढरपेशा दरोडेखोरांनी दरोडा

दापोली: गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पांढरपेशा दरोडेखोरांनी दरोडा घातला आहे. येथील शेतकरी कर्जाच्या खाईत अडकला आहे. देशात सीमेवर शत्रूबरोबर युद्ध करताना किंवा आतंकवादाने जेवढी माणसे मारली गेली नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक म्हणजे तब्बल ६० हजार शेतकऱ्यांनी केवळ महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. राज्यातील जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांचे राज्य शासनाने कर्ज घेतले. मात्र, एक टक्काही क्षेत्र सिंचनाखाली आले नाही. हा सारा पैसा या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दरोडेखोरांनी लुटल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केले.राज्यावर सध्या ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. राज्यातील प्रत्येक दिवशी जन्माला येणारे नवजात अर्भकही २७ हजार रुपयांचे कर्ज घेऊनच जन्माला येत असल्याचे ते म्हणाले, एवढे कर्ज घेवूनही राज्याच्या तिजोरीत फक्त उंदीर फिरतात. या सर्व पैशांची राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दरोडेखांरानी विल्हेवाट लावली आहे असा आरोप त्यांनी केला.महाराश्ट्रात युवाशक्ती मजबूत आहे. राज्याचे सरासरी आर्युमान २७ वर्षांचे आहे. यात गेल्या १५ वर्षात्र येईल. युवकाला बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचे काम आघाडी शासनाने केले असल्याचा आरोप करत फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यामध्ये रोजगार आहे. मात्र प्रशिक्षित उमेदवारांची कमी असल्याने बेरोजगारी वाढली आहे. विद्यमान शिक्षण प्दधतीने केवळ कारकून निर्माण करण्याचेच काम केले. पदवीधर असलेल्या आताच्या युवकाला साधी चपराशाची नोकरीही मिळत नाही. शिक्षणाचेही खाजगीकरण नि व्यापारीकरण होते आहे. युवकांच्या शक्तीला जर मानव संसाधनेत परावर्तीत केले तर राजयाची परिस्थिती नक्कीच बदलू शकते. यासाठी भाजपच्यावतीने तब्बल २ कोटी नवयुवकांना प्रशिक्षित करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहितीही आ.फडणवीस यांनी दिली.या सभेमध्ये मंडणगडचे भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन थोरे, खेडचे तालुकाध्यक्ष संजय बुटाला, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिायचे सरचिटणीस अजित तांबे, अर्चना येलवे, राहुल जाधव यांची भाषणे झाली.(प्रतिनिधी)