शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

'डोळ्यात पाणी आणून लोकांपुढं जाणं लोकांना पटत नाही, पवारांकडून पंकजा मुंडे लक्ष्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 3:51 PM

Maharashtra Election Result 2019: धनंजय मुंडेंनी परळी मतदारसंघातून विजय मिळवला. धनंजय यांनी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतली होती.

परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडेंचा विजय झाला. धनंजय मुंडेंनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे. राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात अखेर भावाने बाजी मारली आहे. पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. परळीतील निकालावर पवारांनी सरळसरळ प्रतिक्रिया दिला. मात्र, यावेळी पंकजा मुंडेंना टोलाही लगावला. डोळ्यात पाणी आणून लोकांपुढं जाणं लोकांना पटत नाही, असे म्हणत पवारांनी पंकजा यांच्या भावनिक राजकारणाला आता लोकांमध्ये स्थान उरले नसल्याचे सूचवलंय.  

धनंजय मुंडेंनी परळी मतदारसंघातून विजय मिळवला. सुरुवातीपासूनच त्यांनी मतांची आघाडी घेतली होती. निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोपामुळे परळी मतदारसंघातील लढत राज्यात चर्चेचा विषय बनली होती. धनंजय मुंडेंच्या व्हायरल क्लिपनंतर पंकजा यांना आलेली भोवळ आणि त्यानंतर बदललेलं राजकीय वातावरण परिणामकारक ठरेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, पंकजा यांच्या भावनिक राजकारणाला जनतेनं लाथाडत निवडणुकीत धनंजय मुंडेंना कौल दिला. परळीतील या विजयावर भाष्य करताना पवारांनी पंकजा मुंडेंना लक्ष्य केलं. 

परळी मतदारसंघाबाबत बोलताना, या विजयाची मला अपेक्षा होती. धनंजय मुंडेंचा विजय माझ्यासाठी आश्चर्यकारक निकाल नसल्याचे पवारांनी म्हटले. ज्यावेळी आपल्याकडे दाखवायला काम नसतं, तेव्हा डोळ्यात पाणी आणून लोकांपुढं जाणं. आता, लोकांना हे पटत नाही, त्यामुळेच लोकांनी त्यांचा पराभव केला. मला संबंध महाराष्ट्राची नवीन पिढी राजकारणात आणायची आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या विजयाचा आनंद असून तो विजय होणारच होता, असे म्हणत शरद पवारांनी पंकजा मुंडेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. दरम्यान, पक्षांतराची नाराजी लोकांमध्ये दिसून आली, अपवादात्मक जागा सोडल्या तर पक्षांतर करणाऱ्यांना लोकांनी जागा जागावली. साताऱ्याच्या गादीचा आदर आहे. पण, त्या कुटंबातील लोकांनी गादीची प्रतिष्ठा जपली नाही, असे म्हणत शरद पवारांनी भाजपा नेते उदयनराजे भोसलेंवर टीका केली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPankaja Mundeपंकजा मुंडेparli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडे