23 Nov, 24 10:42 PM
आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
शिंदे सेनेकडून सर्वाधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असून त्याचीच निवड नेतेपदी केली आहे.अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.ते विजयी मिरवणूकी नंतर सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आले असले तरी निर्णय हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस घेतील आम्ही नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे.ते योग्य निर्णय घेतील असेही केसरकर म्हणाले.
23 Nov, 24 09:38 PM
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय झाला. अतिशय अतिशय अतितटीच्या लढतीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या रविंद्र चव्हाण यांना ५ लाख ८६ हजार ७८८ मते घेतली तर भाजपच्या डॉ. संतुकराव हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३२१ मते मिळाली.
23 Nov, 24 09:20 PM
काँग्रेसने बाळासाहेबांच्या धोरणांना कधीही पसंती दिली नाही - पंतप्रधान मोदी
"काँग्रेसने शिवसेनेच्या एका गटाला आपल्याबरोबर घेतले. पण त्यांनी बाळासाहेबांच्या धोरणांना कधीही पसंती दिली नाही. म्हणूनच मी त्यांना आव्हान दिले होते की, काँग्रेसच्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना आपल्या भाषणातून सांगावे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
23 Nov, 24 09:18 PM
काँग्रेस पूर्णपणे परजीवी झालीय; विधानसभेच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींची टीका
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पूर्णपणे परजीवी झाल्याचे आता सिद्ध झाले आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेस यापुढे कधीही स्वबळावर जिंकू शकत नाही. भारतातील सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
23 Nov, 24 08:54 PM
अपक्ष आमदारासाठी एकनाथ शिंदेंनीं थेट हेलिकॉप्टरच पाठवलं
जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरद सोनावणे यांचा विजय झाला आहे. त्यांच्यासाठी शनिवारी दुपारीच जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टर पाठवलं होतं.
23 Nov, 24 08:53 PM
नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी निसटता विजय
साकोली विधानसभेच्या मतमोजणीत अखेरच्या क्षणी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय झाला.
23 Nov, 24 08:13 PM
विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सेलिब्रेशन केल्यानंतर नागपूर गाठले. तेथे जाऊन त्यांनी सर्वात आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आशीर्वाद घेतले.
23 Nov, 24 07:51 PM
अखेर फेरमतमोजणी नंतर आमदार रोहित पवार यांचा निसटता विजय
कर्जत-जामखेड: अखेर महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांचा १,२४३ मतांनी विजय झाला. पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ मते मिळाली तर महायुतीचे आमदार राम शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मते मिळाली. अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ३,४८९ मते मिळाली. तसेच अपक्ष राम नारायण शिंदे यांना ३९२ तर नोटा ला ६०१ मते मिळाली.
23 Nov, 24 07:45 PM
मी सातव्यांदा विजयी, पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार- गिरीश महाजन
"जामनेर विधानसभा मतदारसंघातून मी सातव्यांदा विजयी झालो. महाराष्ट्रात भाजपला भरघोस पाठिंबा मिळाला आणि आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो", अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.
23 Nov, 24 07:27 PM
विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
महायुतीच्या विजयानंतर भाजपाच्या बड्या नेतेमंडळींनी एकच जल्लोष केला. यावेळी भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रसाद लाड यांनी जिलब्या तळून विजयाचा गोडवा वाढवला.
23 Nov, 24 07:19 PM
विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
महायुतीच्या विजयानंतर भाजपाच्या बड्या नेतेमंडळींनी एकच जल्लोष केला. यावेळी भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रसाद लाड यांनी जिलब्या तळून विजयाचा गोडवा वाढवला.
23 Nov, 24 06:33 PM
आर्णीमध्ये भाजपचे राजू तोडसाम विजयी
यवतमाळ : आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपचे राजू तोडसाम पुढे होते. २७ व्या फेरीअखेर तोडसाम हे २९ हजार ३१३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार जितेंद्र मोघे यांचा पराभव केला. तोडसाम यांना एक लाख २७ हजार २०३ मते मिळाली. तर जितेंद्र मोघे यांना २७ हजार ८९० मतांवर थांबावे लागले. प्रहारच्या नीता मडावी तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना एक हजार ८०४, तर बसपाचे बबन सोयाम यांना १७०० मते मिळाली.
23 Nov, 24 06:21 PM
मध्य नागपूर 21 वी फेरी
भाजप- 86289
काँग्रेस-74560
23 Nov, 24 06:20 PM
दक्षिण नागपूर मतदार संघ 23वी फेरी
मोहन मते यांची आघाडी 12626
23 Nov, 24 06:20 PM
शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर ४२ हजार ३०१ मतांनी विजयी
यवतमाळ : दिग्रस विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार संजय राठोड हे २८ हजार ७७५ इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांचा हा सलग पाचवा विजय आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला. संजय राठोड यांना एक लाख ४३ हजार ११५ इतकी मते मिळाली. तर ठाकरे यांना एक लाख १४ हजार ३४० मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे नाजुकराव धांदे हे राहिले. त्यांना एक हजार ९८५ मते मिळाली, तर बसपाचे संदीप देवकते यांना ८४० मतांवर समाधान मानावे लागले. दिग्रसमधील या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
23 Nov, 24 06:18 PM
शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर ४२ हजार ३०१ मतांनी विजयी
कल्याण पश्चिम अंतिम फेरी
विश्वनाथ भोईर (शिंदेसेना): १,२४,८७६
सचिन बासरे (उद्धवसेना) : ८२,५७५
उल्हास भोईर (मनसे) : २१,८९५
नोटा : २७१६
23 Nov, 24 06:07 PM
अतिशय, अनपेक्षित, अनाकलनीय निकाल - उद्धव ठाकरे
अतिशय, अनपेक्षित, अनाकलनीय निकाल आहे. जे जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी महाविकास आघाडीला मत दिलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटला आहे की नाही हा एक प्रश्न आहे - उद्धव ठाकरे
23 Nov, 24 06:06 PM
ठाणे जिल्हा - 18 विधानसभा 2024 निकाल
1- कोपरी पाचपाखाडी
- एकनाथ शिंदे, शिवसेना- विजयी
- केदार दिघे, उबाठा - पराभुत
2-ठाणे शहर
-संजय केळकर भाजप - विजयी
- राजन विचारे, ठाकरे गट - पराभूत
3-ओवळा-माजीवडा
- प्रताप सरनाईक, शिवसेना शिंदे गट- विजयी
- नरेश मणेरा, ठाकरे गट - पराभूत
4-कळवा-मुंब्रा
- जितेंद्र आव्हाड,राष्ट्रवादी (शरद पवार) - विजयी
- नजीब मुल्ला, राष्ट्रवादी (अजितदादा) - पराभूत
5-मीरा भाईंदर
- नरेंद्र मेहता, भाजप - विजयी
- मुजफर हुसेन, काँग्रेस - पराभुत
6-अंबरनाथ
-डॉ.बालाजी किणीकर,शिवसेना- शिंदे गट - विजयी
:राजेश वानखेडे, राष्ट्रवादी (श.प.गट) - पराभूत
7-मुरबाड
-किसन कथोरे, भाजप - विजयी
सुभाष पवार, राष्ट्रवादी (श.प.गट) - पराभूत
8-उल्हासनगर
-कुमार आयलानी -भाजप विजयी
-ओमी कलानी - (श.प. गट) पराभूत
9-शहापूर- :
दौलत दरोडा, राष्ट्रवादी (अजितदादा) - विजयी
: पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादी (श.प. गट) - पराभूत
10-ऐरोली
: गणेश नाईक, भाजप - विजयी
: विजय चौगुले, अपक्ष - पराभूत
11-बेलापूर
: मंदा म्हात्रे, भाजप - विजयी
: संदीप नाईक, राष्ट्रवादी (श.प. गट) - पराभूत
12-भिवंडी ग्रामीण
: शांताराम मोरे, शिवसेना - विजयी
: महादेव घाटाळ, ठाकरे गट - पराभूत
13-भिवंडी पूर्व
: रईस शेख, समाजवादी पार्टी, विजयी
: संतोष शेट्टी, शिवसेना (शिंदे गट) - पराभूत
14-भिवंडी पश्चिम
: महेश चौगुले,भाजप - विजयी
: रियाझ आजमी,स.पा. पराभूत
15-कल्याण पूर्व
: सुलभा गायकवाड, भाजप -विजयी
: महेश गायकवाड, अपक्ष शिवसेना बंडखोर पराभूत
16-कल्याण ग्रामीण
: राजेश मोरे शिवसेना (शिंदेगट) विजयी
: प्रमोद उर्फ राजु पाटील,मनसे - पराभूत
17-कल्याण पश्चिम
: विश्वनाथ भोईर,शिवसेना- शिंदे गट - विजयी
: सचिन बासरे, ठाकरे गट - पराभूत
18-डोंबिवली
: रविंद्र चव्हाण,भाजप - विजयी
: दिपेश म्हात्रे, ठाकरे गट - पराभूत
23 Nov, 24 06:03 PM
शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर ४१ हजार ९६९ मतांनी आघाडीवर
कल्याण पश्चिम बावीस फेरी
विश्वनाथ भोईर (शिंदेसेना): १,२३,८२४
सचिन बासरे (उद्धवसेना) : ८१,८५५
उल्हास भोईर (मनसे) : २१,८४८
23 Nov, 24 06:03 PM
मोदींनी जनतेचे मानले आभार
विकासाचा विजय! सुशासनाचा विजय! एकजुट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊ. रालोआला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे, विशेषतः राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. जनतेला मी ग्वाही देतो की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी यापुढेही काम करत राहील. जय महाराष्ट्र - नरेंद्र मोदी
23 Nov, 24 05:53 PM
गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांचा ६१००९ मतांनी विजयी.
23 Nov, 24 05:50 PM
शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर ३९ हजार ५०६ मतांनी आघाडीवर
कल्याण पश्चिम - एकवीस फेरी
विश्वनाथ भोईर (शिंदेसेना): १,१७,६५५
सचिन बासरे (उद्धवसेना) : ७८,१४९
उल्हास भोईर (मनसे) : २०,६६२
23 Nov, 24 05:37 PM
उमरखेडमध्ये भाजपचे किसन वानखेडे १६ हजार ६२९ मतांनी विजयी
उमरखेड : उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे किसन वानखेडे यांनी १६ हजार ६२९ मतांनी काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांचा पराभव केला. किसन वानखेडे यांना एक लाख आठ हजार ६८२ मते मिळाली. तर काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांना ९२ हजार ५३ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या मतदारसंघात मतदारांनी दोन्ही बंडखाेर माजी आमदारांना धूळ चारल्याचे दिसून येते. काँग्रेसचे बंडखोर विजय खडसे यांना अवघी दोन हजार ८८१ मते मिळाली, तर भाजपचे बंडखोर माजी आमदार राजेंद्र नजरधने हे मनसेकडून निवडणूक मैदानात होते. त्यांना सात हजार ६१ इतकी मते मिळाली आहेत.
23 Nov, 24 05:31 PM
शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर ३७ हजार ४८१ मतांनी आघाडीवर
कल्याण पश्चिम - विसावी फेरी
विश्वनाथ भोईर (शिंदेसेना): १,१२,२७३
सचिन बासरे (उद्धवसेना) : ७४,७९२
उल्हास भोईर (मनसे) : १९,७६३
23 Nov, 24 05:30 PM
आशुतोष काळे यांनी घेतले विक्रमी मताधिक्य
कोपरगाव (जि. अहिल्यानगर) : राज्यात विक्रमी मताधिक्य घेणाऱ्या उमेदवारांमध्ये कोपरगाव विधानसभेतून निवडून आलेले आशुतोष काळे यांचे नाव निश्चित असणार आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल एक लाख २४ हजार ६२४ मतांनी पराभव केला. आशुतोष काळे यांना १,६०,०४२ मते मिळाली तर संदीप वर्पे यांना ३६,२०४ मते मिळाली. टपाली मतांमध्येही ७८६ मते घेत काळे आघाडीवर राहिले.
23 Nov, 24 05:24 PM
गोंदिया : आमगाव मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार संजय पुराम ३३६११ मतांनी विजयी.
23 Nov, 24 05:21 PM
गोंदिया : तिरोडा मतदारसंघातून भाजपाचे विजय रहांगडाले ४२६२८ मतांनी विजयी.
23 Nov, 24 05:19 PM
विश्वनाथ भोईर ३५ हजार ९८९ मतांनी आघाडीवर
कल्याण पश्चिम - एकोणवीस फेरी
विश्वनाथ भोईर (शिंदेसेना): १,०७,४३२
सचिन बासरे (उद्धवसेना) : ७१,४४३
उल्हास भोईर (मनसे) : १९,२३९
23 Nov, 24 05:17 PM
"जनतेचा हा निर्णय स्वीकारावाच लागणार"
निवडणूक निकाल महाविकास आघाडीच्या दृष्टीने अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. जनतेचा हा निर्णय स्वीकारावाच लागणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून झालेले अर्थपूर्ण राजकारण हे लोकशाहीचे भविष्य धोक्यात टाकणारे आहे. आता महायुतीचे सरकार एकहाती आलेले आहे. त्यांनी जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे - खासदार शाहू छत्रपती
23 Nov, 24 05:16 PM
राजकुमार बडोले 16415 मतांनी विजयी
टपाल मतपत्रिकेनंतर अंतिम आकडेवारी
राजकुमार बडोले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 82506
दिलीप बनसोड काँग्रेस 66091
23 Nov, 24 05:15 PM
२०४५५ मतांनी आमदार मोनिका राजळे विजयी
23 Nov, 24 05:15 PM
मध्य नागपूर 21 वी फेरी
मध्य नागपूर भाजपाचे प्रविन दटके 11724 मतांनी आघाडीवर
भाजप--4061
काँग्रेस-3580
23 Nov, 24 05:14 PM
मध्य नागपूर 20 वी फेरी
मध्य नागपूर भाजपाचे प्रविन दटके 11243 मतांनी आघाडीवर
भाजप--4761
काँग्रेस-3975
23 Nov, 24 05:13 PM
कर्जत-जामखेड 26 फेरी
शेवटच्या फेरीत रोहित पवार यांना 391 मतांची आघाडी
रिकॉउंटिंगसाठी राम शिंदे यांनी दिला अर्ज.
23 Nov, 24 05:12 PM
कर्जत-जामखेड 26 फेरी
रोहित पवार (राष्ट्रवादी शरद पवार) - 1,25,396
प्रा. राम शिंदे (भाजपा) - 1,25,005
23 Nov, 24 05:11 PM
पुसद मतदारसंघातून इंद्रनील नाईक ९० हजार ७६९ मतांनी विजयी
पुसद : पुसद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार इंद्रनील नाईक यांनी ९० हजार ७६९ इतक्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. इंद्रनील नाईक यांना एक लाख २७ हजार ९६४ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शरद मैंद यांना ३७ हजार १९५ मतांवर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे माधवराव वैद्य राहिले. वैद्य यांना ३६ हजार ५७५ मते मिळाली. इंद्रनील नाईक सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाची घोषणा होताच पुसद परिसरात महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
23 Nov, 24 05:10 PM
अजित पवार गटाचे मांडेकर विजयी
भोरमध्ये सलग ३ वेळा निवडून आलेले काँग्रेसचे आमदार पराभूत; अजित पवार गटाचे मांडेकर विजयी
23 Nov, 24 05:06 PM
अमित झनक - ६,१३६ मतांनी विजयी
रिसोड विधानसभा मतदारसंघ
अमित झनक (काँग्रेस) - ७६,८०९
अनंतराव देशमुख (अपक्ष) - ७०,६७३
भावना गवळी (शिंदेसेना) - ६०६९३
23 Nov, 24 05:05 PM
महाविकास आघाडीचा पुरता सफाया
राज्यभर दिसून आलेल्या लाटेप्रमाणे खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतही महायुतीची लाट दिसून आली. त्यात महाविकास आघाडीचा पुरता सफाया झाला. विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच जळगाव व धुळे जिल्ह्यात काँग्रेसला खातेसुद्धा उघडता आले नाही. खान्देशातील २० जागांपैकी केवळ नवापूरची जागा सोडली तर इतर १९ च्या १९ जागा महायुतीने जिंकल्या. नवापूरला काँग्रेसचे शिरिष सुरुपसिंग नाईक हे आमदारकी कायम राखण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे खान्देशात महाविकास आघाडीची भोपळ्याची नामुष्की टळली.
23 Nov, 24 05:00 PM
दिलीप वळसे पाटील विजयी
आंबेगावात निसटता विजय; दिलीप वळसे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी विजयी, देवदत्त निकम पराभूत
23 Nov, 24 04:59 PM
बाबाजी काळेंचा दणदणीत विजय
खेड आळंदी विधानसभेत मशाल पेटली; बाबाजी काळेंचा दणदणीत विजय, मोहिते पाटलांचा पराभव
23 Nov, 24 04:54 PM
एकनाथ शिंदे १,२०,७१७ मतांनी विजयी
23 Nov, 24 04:54 PM
शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर ३४ हजार ८३० मतांनी आघाडीवर
कल्याण पश्चिम - अठरावी फेरी
विश्वनाथ भोईर (शिंदेसेना): १,०२,३७१
सचिन बासरे (उद्धवसेना) : ६७,५४१
उल्हास भोईर (मनसे) : १८,७००
23 Nov, 24 04:51 PM
सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे देवेंद्र कोठे ४८ हजार ४०५ मतांनी विजयी, एमआयएम उमेदवाराचा मोठा पराभव
23 Nov, 24 04:51 PM
सोलापूर : ठाकरे सेनेने सोलापूर जिल्ह्यात खातं उघडलं; बार्शी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री दिलीप सोपल ६१६९ मतांनी विजयी
23 Nov, 24 04:51 PM
नागपूर दक्षिण
फेरी 18
गिरीश पांडव (काँग्रेस) : 3686
मोहन मते (भाजप): 6102
मोहन मते एकूण लीड 5507
23 Nov, 24 04:50 PM
मतदारसंघ : वणी
२३ वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) संजीवरेड्डी बोदकुरवार (भाजप) - 75251
२) संजय देरकर (उद्धव शिवसेना) - 88506
२३ व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे संजय देरकर 13255 मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : राळेगाव
२० वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) अशोक उईके (भाजप) - 81126
२) वसंत पुरके (काँग्रेस) - 76822
३) किरण कुमरे (वंचित) - 2507
२० व्या फेरीअखेर महायुतीचे अशोक उईके 4304 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 04:50 PM
मतदारसंघ : पुसद
२० वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी अजित पवार) - 108078
२) माधव वैद्य (वंचित) - 27422
३) शरद मैंद (राष्ट्रवादी शरद पवार) - 31306
२० व्या फेरीअखेर महायुतीचे इंद्रनील नाईक 79572 मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : आर्णी
२५ वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) राजू तोडसाम (भाजप) - 118560
२) जितेंद्र मोघे (काँग्रेस) - 91303
२५ व्या फेरीअखेर महायुतीचे राजू तोडसाम 27257 मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : दिग्रस
२९ वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) संजय राठोड (शिवसेना-शिंदे) - 143261
२) माणिकराव ठाकरे (काँग्रेस) - 114095
२९ व्या फेरीअखेर महायुतीचे संजय राठोड 29122 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 04:49 PM
किसनराव वानखेडे 15940 मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : उमरखेड २५ वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) किसनराव वानखेडे (भाजप) - 107044
२) साहेबराव कांबळे (काँग्रेस) - 91104
23 Nov, 24 04:48 PM
बाळासाहेब मांगुळकर 8555 मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : यवतमाळ - २१ वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) बाळासाहेब मांगुळकर (काँग्रेस) - 80025
२) मदन येरावार (भाजप) - 71470
23 Nov, 24 04:42 PM
प्रशांत ठाकूर 48506 ने पुढे
पनवेल विधानसभा 22 वी फेरी
प्रशांत ठाकूर (भाजप) 157808
बाळाराम पाटील (शेकाप ) 109302
लीना गरड (उबाठा ) 41518
23 Nov, 24 04:37 PM
शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर ३१ हजार ७५० मतांनी आघाडीवर
कल्याण पश्चिम सतरावी फेरी
विश्वनाथ भोईर (शिंदेसेना): ९६,०३०
सचिन बासरे (उद्धवसेना) : ६४,२८०
उल्हास भोईर (मनसे) : १७,५२४
23 Nov, 24 04:37 PM
पनवेल विधानसभा 24 वी फेरी
प्रशांत ठाकूर (भाजप) 173935
बाळाराम पाटील (शेकाप ) 123201
लीना गरड (उबाठा ) 42934
23 Nov, 24 04:29 PM
संजय केळकर आघाडीवर
ठाणे शहर विधानसभा ३० फेरी
१) अविनाश जाधव :- मनसे - 96
२) राजन विचारे :- उद्धव सेना - 82
३) संजय केळकर :- भाजप - 203
४) नोटा :- 07
23 Nov, 24 04:27 PM
अमित देशमुख 7859 मतांनी विजयी.
लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख 7859 मतांनी विजयी.
23 Nov, 24 04:23 PM
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ
22 व्या फेरी अखेर भाजप उमेदवार समाधान आवताडे 8900 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 04:23 PM
कल्याण ग्रामीण मतदारसंघ
राजेश मोरे (शिंदे सेना) एकुण मिळालेली मते १३१०९७
प्रमोद (राजू) पाटील (मनसे) एकुण मतं ६९०६५
सुभाष भोईर (उध्दव सेना) एकुण मतं ६४६१८
मतांची आघाडी राजेश मोरे (शिंदे सेना) ६२ हजार ०३२
23 Nov, 24 04:22 PM
बार्शी विधानसभा मतदारसंघ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप सोपल 21 व्या फेरी अखेर 6400 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 04:22 PM
मध्य नागपूर भाजपाचे प्रवीण दटके 9311 मतांनी घेतली आघाडी
23 Nov, 24 04:21 PM
संजय केळकर आघाडीवर
ठाणे शहर विधानसभा २९ फेरी
१) अविनाश जाधव :- मनसे - 1566
२) राजन विचारे :- उद्धव सेना - 1688
३) संजय केळकर :- भाजप - 4702
४) नोटा :- 91
23 Nov, 24 04:14 PM
नागपूर दक्षिण - फेरी 16
गिरीश पांडव (काँग्रेस) : 3686
मोहन मते (भाजप): 3652
23 Nov, 24 04:13 PM
प्रशांत ठाकूर 48677 ने पुढे
पनवेल विधानसभा 23 वी फेरी
प्रशांत ठाकूर (भाजप) 165224
बाळाराम पाटील (शेकाप ) 116547
लीना गरड (उबाठा ) 42192
23 Nov, 24 04:12 PM
शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर २८ हजार २८५ मतांनी आघाडीवर
कल्याण पश्चिम सोळवी फेरी
विश्वनाथ भोईर (शिंदेसेना): ९०,१०४
सचिन बासरे (उद्धवसेना) : ६१,८१९
उल्हास भोईर (मनसे) : १६,५१५
23 Nov, 24 04:12 PM
बुलढाण्यात अटीतटीच्या लढतीत शिंदेसेनेचे संजय गायकवाड विजयी
बुलढाणा : मतदारसंघात शिंदेसेनेचे संजय गायकवाड आणि उद्धवसेनेच्या जयश्री शेळके यांच्यामध्ये अटीतटीची लढत पहावयास मिळाली. फेरी दर फेरीत मतांची आकडेवारी दोन्ही उमेदवारांसह समर्थकांच्या काळजाचा ठोका वाढविणारी ठरली. अतिशय चुरशीच्या लढतीत संजय गायकवाड यांनी ८४१ मतांनी विजय मिळवला.
23 Nov, 24 04:09 PM
दक्षिण पश्चिम नागपूर देवेंद्र फडणवीस 23व्या फेरीअखेरीस 33,864 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 04:08 PM
संजय केळकर आघाडीवर
ठाणे शहर विधानसभा
१) अविनाश जाधव :- मनसे - 1584
२) राजन विचारे :- उद्धव सेना - 1641
३) संजय केळकर :- भाजप - 4349
४) नोटा :- 95
23 Nov, 24 04:07 PM
प्रशांत ठाकूर 48506 ने पुढे
पनवेल विधानसभा 22 वी फेरी
प्रशांत ठाकूर (भाजप) 157808
बाळाराम पाटील (शेकाप ) 109302
लीना गरड (उबाठा ) 41518
23 Nov, 24 04:06 PM
खोट्या बातम्या देतात त्याचे दुःख वाटते- अजित पवार
आमचा विजय होत आहे. पण माध्यमे खोट्या बातम्या देतात त्याचे दुःख वाटते. कारण मी सकाळी पोस्टल बॅलेटमध्ये पुढे होते. तरीही काही वृत्तवाहिन्यांनी मी पिछाडीवर असल्याची बातमी बिनधोकपणे दाखवली. माध्यमांनी जबाबदारीने बातम्या देणे गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले.
23 Nov, 24 04:04 PM
मतदारसंघ - यवतमाळ
फेरी 20 वी पूर्ण
बाळासाहेब मांगूळकर (कॉंग्रेस) - 75,549
मदन येरावार (भाजप)- 67,261
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब मांगूळकर 8,288 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 04:00 PM
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील विजयी
- गुलाबराव पाटील यांना मिळाले मत १ लाख ४२ हजार ५९१ मिळाले मत
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर - ८३ हजार ४६१ यांना मिळाले मत
शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील ५९ हजार १३० मतांनी विजयी...
23 Nov, 24 03:59 PM
चांदीवलीत दिलीप लांडे आघाडीवर
शिवसेना शिंदे गटाचे दिलीप लांडे 21278 मतांनी आघाडीवर आहेत. 29 पैकी 12 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झालीय. काँग्रेसचे नसीम खान आणि मनसेचे महेंद्र भानुशाली यांचं आव्हान होतं.
23 Nov, 24 03:58 PM
ठाणे शहर विधानसभा
२६ फेरी
१) अविनाश जाधव :- मनसे - 1371
२) राजन विचारे :- उद्धव सेना - 2375
३) संजय केळकर :- भाजप - 4101
४) नोटा :- 92
संजय केळकर आघाडीवर
आता पर्यंत 48161 आघाडीवर संजय केळकर
23 Nov, 24 03:46 PM
मतदारसंघ - उल्हासनगर
१९ वी फेरी
- कुमार आयलानी (भाजप ) ८२,२३१ मते
- ओमी कलानी (शरद पवार गट ) ५१,४७७ मते
भाजपचे कुमार आयलानी ३०,७५४ मतांने विजयी
23 Nov, 24 03:39 PM
मतदारसंघ - यवतमाळ
फेरी 18 वी
बाळासाहेब मांगूळकर (कॉंग्रेस) - 70,555
मदन येरावार (भाजप) - 57,860
महाविकास आघाडीचे बाळासाहेब मांगूळकर 12,695 मतांनी आघाडीवर.
23 Nov, 24 03:32 PM
मतदारसंघ : राळेगांव
18 वी फेरी
१) प्रा. अशोक उइके (महायुती)-65635
२) प्रा. वसंत पुरके (महाविकास आघाडी) - 61103
भाजपचे प्रा. अशोक उईके 4532 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 03:31 PM
भिवंडी पूर्व मतदार संघात समाजवादी पार्टीचे रईस शेख विजयी
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे आ. रईस शेख विजयी झाले आहेत. रईस शेख यांना एकूण १ लाख १९ हजार ४५४ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे सेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांना एकूण ६७ हजार ६७० मते मिळाली आहेत. रईस शेख हे ५१ हजार ७८४ मतांनी विजयी झाले आहेत.
23 Nov, 24 03:31 PM
मतदारसंघ - अर्जुनी मोरगाव
फेरी 19
राजकुमार बडोले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 67559
दिलीप बनसोड काँग्रेस 53118
राजकुमार बडोले यांना 14441 मतांची आघाडी
23 Nov, 24 03:15 PM
नागपूर जिल्ह्यात ८ मतदारसंघात महायुती आघाडीवर
१) काटोल : चरणसिंग ठाकूर (महायुती-भाजप) - विजयी
२) सावनेर : डॉ.आशिष देशमुख (महायुती-भाजप) - आघाडीवर
३) रामटेक : आशिष जयस्वाल (महायुती-शिंदेसेना) - आघाडीवर
४) कामठी : चंद्रशेखर बावनकुळे (महायुती-भाजप) - आघाडीवर
५) उमरेड : संजय मेश्राम (महाविकास आघाडी-कॉंग्रेस) - विजयी
६) हिंगणा : समीर मेघे (महायुती-भाजप) - आघाडीवर
७) नागपूर दक्षिण-पश्चिम : देवेंद्र फडणवीस (महायुती-भाजप) - आघाडीवर
८) नागपूर पश्चिम : विकास ठाकरे (महाविकास आघाडी-कॉंग्रेस) - आघाडीवर
९) नागपूर मध्य : बंटी शेळके (महाविकास आघाडी-कॉंग्रेस) - आघाडीवर
१०) नागपूर उत्तर : नितीन राऊत (महाविकास आघाडी-कॉंग्रेस) - आघाडीवर
११) नागपूर पूर्व : कृष्णा खोपडे (महायुती-भाजप) - आघाडीवर
१२) नागपूर दक्षिण : मोहन मते (महायुती-भाजप) - आघाडीवर
23 Nov, 24 03:23 PM
सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रिक; शहरात समर्थकांचा जल्लोष
जळगाव : विधानसभा निवडणूकीच्या जळगाव शहर मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे सुरेश भोळे यांचा विजय निच्चीत झाला असून त्यांनी विजयाची हॅट्रीक साधली आहे. या विजयाचा जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर तसेच त्यांच्या घरी व भाजपच्या पदाधिकारी व कार्यर्त्यांची घरी गुलाल उधळून व ढोल ताशे व डिजे लावून केला जात आहे.
23 Nov, 24 03:22 PM
अनुप अग्रवाल आघाडीवर
धुळे शहर मतदारसंघात १९व्या फेरी अखेर भाजपचे अनुप अग्रवाल ३२६४१ मतांनी आघाडीवर आहेत.
23 Nov, 24 03:21 PM
मतदारसंघ - कल्याण ग्रामीण
आतापर्यंत २२ व्या फेरी अखेर मिळालेली एकूण मते...
- राजेश मोरे (शिंदे सेना) एकूण मिळालेली मते १०३१२७
- प्रमोद (राजू) पाटील (मनसे) एकूण मतं ४९६४७
- सुभाष भोईर (ठाकरे गट)
एकूण मतं ४७६२९
मतांची आघाडी राजेश मोरे (शिंदे सेना) ५३ हजार ४७८
23 Nov, 24 03:18 PM
मतदारसंघ - पनवेल
18 वी फेरी
प्रशांत ठाकूर (भाजप) 128021
बाळाराम पाटील (शेकाप ) 90702
लीना गरड (उबाठा ) 36107
प्रशांत ठाकूर 37319 मतांनी पुढे...
23 Nov, 24 03:15 PM
मतदारसंघ - माळशिरस
भाजपचे राम सातपुते यांचा पराभव; शरद पवार गटाचे उत्तम जानकर 13 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
23 Nov, 24 03:14 PM
मतदारसंघ - रिसोड
१८व्या फेरीअखेर -
अमीत झनक (काँग्रेस) - ५५,४५०
अनंतराव देशमुख (अपक्ष) - ४५,१४१
भावना गवळी (शिंदेसेना) - ४४,५९५
अमीत झनक - १०,३०९ मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 03:12 PM
मतदारसंघ : राळेगाव
१३ वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) अशोक उईके (महायुती) - 53289
२) वसंत पुरके (महाविकास आघाडी) - 48552
३) किरण कुमरे (वंचित) - 1632
१३ व्या फेरीअखेर महायुतीचे अशोक उईके 4737 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 03:12 PM
मतदारसंघ : वणी
२० वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) संजीवरेड्डी बोदकुरवार (महायुती) - 62964
२) संजय देरकर (महाविकास आघाडी) - 75941
२० व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे संजय देरकर 12975 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 03:12 PM
मतदारसंघ : दिग्रस
२४ वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) संजय राठोड (महायुती) - 119931
२) माणिकराव ठाकरे (महाविकास आघाडी) - 97920
२४ व्या फेरीअखेर महायुतीचे संजय राठोड 22011 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 03:11 PM
मतदारसंघ : आर्णी
१९ वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) राजू तोडसाम (महायुती) - 90127
२) जितेंद्र मोघे (महाविकास आघाडी) - 71900
१९ व्या फेरीअखेर महायुतीचे राजू तोडसाम 18227 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 03:11 PM
मतदारसंघ : पुसद
२० वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) इंद्रनील नाईक (अजित पवार) - 108078
२) माधव वैद्य (वंचित) - 27422
३) शरद मैंद (शरद पवार) - 31306
२० व्या फेरीअखेर अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक 79572 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 03:11 PM
मतदारसंघ : उमरखेड
१८ वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) किसनराव वानखेडे (महायुती) - 78885
२) साहेबराव कांबळे (महाविकास आघाडी) - 65399
३) राजेंद्र नजरधने (मनसे) - 5360
१८ व्या फेरीअखेर महायुतीचे किसनराव वानखेडे 13486 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 03:10 PM
मतदारसंघ : यवतमाळ
१७ वी फेरी
उमेदवाराचे नाव - मिळालेली मते
१) बाळासाहेब मांगुळकर (महाविकास आघाडी) - 64541
२) मदन येरावार (महायुती) - 54293
३) नीरज वाघमारे (वंचित) -
१७ व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे बाळासाहेब मांगुळकर 10248 मतांनी आघाडीवर
23 Nov, 24 03:09 PM
जळगाव जिल्ह्यात सर्वाच्या सर्व 11 जागांवर महायुती आघाडीवर
राजुमामा भोळे - जळगाव शहर
गिरीश महाजन - जामनेर
गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण
संजय सावकारे - भुसावळ
अमोल जावळे - रावेर
अनिल पाटील - अमळनेर
मंगेश चव्हाण - चाळीसगाव
किशोर पाटील - पाचोरा
अमोल पाटील - पारोळा
चंद्रकांत पाटील - मुक्ताईनगर
चंद्रकांत सोनवणे - चोपडा
23 Nov, 24 03:08 PM
भाजपाचे देवेंद्र कोठे विजयी
सोलापूर शहर मध्य मतदार संघातून भाजपाचे देवेंद्र कोठे विजयी झाले आहेत.चाळीस हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी घेत केला विजयाचा जल्लोष. भाजपाचे देवेंद्र कोठे विरुद्ध एमआयएमचे फारूक शाब्दी यांच्यात लढत होती.
23 Nov, 24 03:07 PM
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात काय स्थिती?
२० वी फेरी कोपरी-पाचपाखाडी
एकनाथ शिंदे (शिंदे सेना) : ५९५५
केदार दिघे (उद्धव सेना) : ९१४
मनोज शिंदे (काँग्रेसचे बंडखोर): १२
नोटा : ८२
एकूण मते : ६९९५
आतापर्यंत एकूण मते: १,५४, ७०३
एकनाथ शिंदे : ५०४१ मतांनी आघाडीवर
आतापर्यंत शिंदे यांना एकूण मते : १,२०,६२१
केदार दिघे यांना एकूण मते : २९४७६
एकूण मतांमध्ये शिंदे ९११४५ इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.
23 Nov, 24 02:52 PM
कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपाचे उमेदवार सुलभा गायकवाड विजयी
विजय उमेदवार
सुलभा गायकवाड (भाजप )
मिळालेली मते,: ८१११४
पराभूत उमेदवार महेश गायकवाड (अपक्ष) शिंदे सेना बंडखोर
मिळालेली मते :५४७८४
सुलभा गायकवाड यांना मिळालेले मताधिक्य :२६३३०
23 Nov, 24 02:40 PM
लोह्यामध्ये मतमोजणी दरम्यान दगडफेक
नांदेड : जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघांमध्ये शनिवार २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी दरम्यान दुपारी एक वाजताच्या सुमारास दगडफेक करण्यात आली.
23 Nov, 24 02:39 PM
रवी राणा 67000 मतांनी विजयी
बडनेरा विधानसभा मतदार संघात युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 67000 मतांनी विजयी झाले आहेत.
23 Nov, 24 02:35 PM
रवी राणा 67000 मतांनी विजयी
बडनेरा विधानसभा मतदार संघात युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 67000 मतांनी विजयी झाले आहेत.
23 Nov, 24 02:34 PM
शहाजीबापू पाटील यांचा पराभव
सोलापूर : सांगोल्यात काय झाडी काय डोंगराला भगदाड पडले आहे. शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी झाले असून शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला आहे.
23 Nov, 24 02:30 PM
आमदार सचिन कल्याणशेट्टी सलग दुसऱ्यांदा विजयी
सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा दारुण पराभव केला.