शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

CM असताना कार्पेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:41 IST

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यांवर आणि शेतकऱ्यांच्या भेटीगाठींवरून थेट टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी 'कार्पेट' सोडले नाही. सततच्या पराभवानंतर त्यांना लोकांमध्ये जावे लागत असल्याची जाणीव झाली. म्हणूनच ते घराबाहेर पडले आहेत,असा टोला फडणवीसांनी लगावला. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले होते, त्यावेळेस ते कार्पेटवरून खाली उतरले नव्हते. आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांच्या लक्षात आले आहे की, लोकांमध्ये जावा लागते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. कारण त्यांना माहिती आहे की, हे लोक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याठिकाणी आलेले आहेत. त्यांना जनतेकडून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. म्हणून लोक पकडून आणण्याचे काम त्याठिकाणी सुरू आहे,' अशीही त्यांनी टीका केली.

शेतकऱ्यांच्या मदत पॅकेजबाबत बोलताना फडणवीस यांनी सरकारी उपाययोजनांचा बचाव केला, तसेच विलंबाचे कारणही स्पष्ट केले. "सरकारचे पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहे. हे खरं आहे की, अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पॅकेज पोहोचले नाही, त्यामुळे त्यांच्यात संभ्रम आहे. पण, आरबीआयच्या नियमानुसार दररोज ६०० कोटी रुपये आम्हाला द्यावे लागतात. त्यामुळे थोडा वेळ लागतोय. लवकरच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय, उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी त्यांना फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असे भाकीत त्यांनी वर्तवले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत ही फसवणूक असल्याचे म्हटले. "राज्य सरकारकडून नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यात आलेले सर्वांत मोठे पॅकेज नाही, तर शेतकऱ्यांना दिलेला आजवरचा सर्वांत मोठा दगा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, तर कर्जमुक्ती दिली पाहिजे. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. मात्र, ती मदत शेतकऱ्यांना न मिळाल्याने सरकारचा खरा चेहरा उघडा पाडण्यासाठी मी आलो आहे", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis Slams Thackeray: No Carpet Abandoned Then, Futile Efforts Now!

Web Summary : Fadnavis criticized Thackeray's farmer outreach, stating he ignored farmers as CM. Now, facing electoral defeats, he's pretending concern. Fadnavis defended government aid, citing RBI regulations for payment delays. Thackeray, touring Marathwada, claims government aid is a betrayal to farmers.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण