शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News LIVE: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी सोडवण्यासाठी नव्या महामार्गाचा आराखडा तयार करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 20:57 IST

लोकसभेतील गोंधळ, राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा, त्याचे राज्यसभेत उमटलेले पडसाद आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि गांधी ...

06 Feb, 26 08:56 PM

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी सोडवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन

दोन दिवसापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गॅसचा टँकर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना २२ तास मनस्ताप सहन करावा लागला होता. या मार्गावरील वाहतूक कोंडी ही नेहमीची झाली आहे, यावर आता राज्य सरकारने तोडगा काढला आहे. दरम्यान, आता सरकार शिरुर-चाकण-तळेगाव-कर्जत या नव्या महामार्गाचा आराखडा तयार करणार आहे. 

06 Feb, 26 08:23 PM

एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने पालकमंत्री शिरसाट यांना झटका

शिंदेसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ यांची निवड करण्याचे आदेश दिले. मात्र ही निवड करताना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना अंधारात ठेवण्यात आल्याने ते नाराज झाले. यातून त्यांनी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या गटाच्या ९ नगरसेवकांची बैठक घेतली. दुसरीकडे भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेकडेही पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली.

06 Feb, 26 08:01 PM

सुनेत्रा पवारांना सांगणार की राष्ट्रीय अध्यक्षपद तुम्हीच सांभाळलं पाहिजे; भुजबळ काय बोलले?

"सोमवार आणि मंगळवारी सुनेत्रा पवार या मुंबईत येणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपद तुम्हीच सांभाळले पाहिजे, हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष पद हे त्यांना दिले पाहिजे, हे आमच्या महिला पदाधिकारी देखील म्हणत आहेत. पक्षाने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री आणि नेता बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हा एकटा तटकरे यांचा निर्णय नव्हता", अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे. 

06 Feb, 26 07:01 PM

महापौर पदाची निवडणूक, भाजपाला एमआयएमच्या नगरसेवकाने केले मतदान

अमरावती महापालिकेत महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. महापौर पदासाठी मतदान होत असताना एमआयएमच्या नगरसेवकाने भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केले.

क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी त्यांना एमआयएममधून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाच्या गटनेत्यांनी दिली. मिराबाई कांबळे असे भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या नगरसेविकेचे नाव आहे. 

06 Feb, 26 06:09 PM

बारामतीत घडामोडींना वेग, शरद पवार पुन्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) प्रमुख म्हणून समोर आल्या आहे. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच बारामतीमध्ये घडामोडींना वेग आला असून, शरद पवारांनी आज पुन्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली.

06 Feb, 26 06:05 PM

सुनेत्रा पवारांची शपथ शरद पवारांना शह देण्यासाठी? मुख्यमंत्री फडणवीस संतापले, म्हणाले...

सुनील तटकरे यांनी विलिनीकरणापूर्वीच शरद पवारांना शह देण्यासाठी सुनेत्रा पवारांना घाईमध्ये शपथ घ्यायला लावली अशी टीका होत आहे, असा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. त्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. 

"मला असं वाटतं की, यासंदर्भात जो काही वाद होतोय अतिशय निरर्थक आणि चुकीच्या प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचे राजकारण यात कसे पाहता येईल, हा प्रयत्न करत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातील मोठे नेते असलेले अजित पवार दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले आहेत. पण, त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्यामाध्यमातून जे काही राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे", अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

06 Feb, 26 05:58 PM

"या व्यक्तीबद्दल आता घृणा यायला लागलीये", अमोल मिटकरी जयंत पाटलांवर भडकले

आमदार अमोल मिटकरींनी शेकापचे जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. मिटकरी म्हणाले, "विधान परिषदेत मी या व्यक्तीचा प्रचंड आदर करायचो. शेकापची पुरोगामी विचारसरणी यामुळे मी सुरुवात पासून प्रभावित आहे. सभागृहातील भाईंची अभ्यासपूर्ण मांडणी मला नेहमी प्रभावित करत राहिली."

"आज ते सभागृहाचे सदस्य म्हणून नाहीत याची नेहमी खंत वाटायची. आपल्या आयुष्याची सर्व अभ्यासपूर्ण हयात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रावाहिनींच्या शपथविधी संदर्भात केलेलं वक्तव्य व बुरसटलेल्या विचारधारेची मांडणी, यामुळे या व्यक्तीबद्दल आता घृणा यायला लागली आहे. त्यांची अहंकारी व उन्मत्त भाषा शेकाप पक्षाच्या विचाराला हरताळ फासणारी ठरली", अशी टीका आमदार मिटकरींनी जयंत पाटलांवर केली. 

'उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी १५ दिवसांनी घेतला असता, तर काय बिघडले असते', अशी टीका शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली होती.

06 Feb, 26 04:51 PM

मोहम्मद सिराजचे पुनरागमन होणार, टी२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्थान मिळणार?

ऐन टी२० विश्वचषकापूर्वीच भारतीय संघाला झटका बसला. हर्षित राणा जखमी झाल्याने त्याच्या जागी कोण खेळणार असा प्रश्न निर्माण झाला. एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हर्षित राणाच्या ऐवजी आता मोहम्मद सिराज याला टीम इंडिया स्थान मिळणार आहे.

 

06 Feb, 26 04:46 PM

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी 'एनआयए'ची थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर धाड

दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी वैद्यकीय सेवेतीलच आहे. या यातील काही आरोपींचा संबंध काश्मीरशी असल्याने केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएने अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाड टाकली. 

06 Feb, 26 04:41 PM

प्रसिद्ध अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अटक

तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अंजू कृष्णा हिला चेन्नईमध्ये अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीकडे अमली पदार्थ (ड्रग्ज) सापडले आहेत. या अटकेच्या बातमीने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. रिपोर्टनुसार, अँटी-नार्कोटिक्स इंटेलिजन्स युनिटच्या (ANIU) साऊथ टीमने वलसरवक्कम भागात छापा टाकला.  वाचा सविस्तर

06 Feb, 26 03:53 PM

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

होळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने विक्रमी संख्येत 'होळी स्पेशल' ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे १४१० पेक्षा जास्त विशेष ट्रेन चालवणार असून गरज पडल्यास ही संख्या १५०० पर्यंत वाढवली जाऊ शकते. या सर्व ट्रेन मार्च महिन्यात धावतील.

06 Feb, 26 03:53 PM

लाखो लोकांचा जीव वाचवला - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग आता बंद करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे रेल्वे अपघातांमध्ये मोठी घट झाली असून लाखो लोकांचा जीव वाचल्याचं मोदींनी म्हटलं आहे. २०१४ पूर्वी केवळ अंमलबजावणीच्या चर्चा होत असत, मात्र रेल्वे क्रॉसिंगवर होणाऱ्या अपघातात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागत होता, अगदी शालेय बसच्या अपघातात मुलांच्या मृत्यूच्या बातम्याही येत असत अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सविस्तर बातमी...

06 Feb, 26 03:38 PM

वैभव सूर्यवंशीचा धमाका, ८० चेंडूत ठोकल्या १७५ धावा; षटकारांची केली बरसात

भारताचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी याने अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तडाखेबाज १७५ धावा ठोकल्या. ८० चेंडूंच्या या खेळीत त्याने १५ चौकार आणि १५ षटकारांसह दीडशतकी खेळी केली. इंग्लंड विरूद्धच्या या सामन्यात वैभवच्या खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली.

06 Feb, 26 03:20 PM

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मोठा बॉम्बस्फोट, अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. हा आत्मघातकी बॉम्बस्फोट असल्याचे मानले जात आहे. इस्लामाबादच्या तारलाई भागात हा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण शहरात आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

06 Feb, 26 03:08 PM

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण; चांदी एका झटक्यात १३,१५५ रुपयांनी स्वस्त

सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर १,०१३ रुपयांनी स्वस्त झाले आहेत, तर चांदीच्या दरात १३,१५५ रुपयांची मोठी घसरण झाली आहे. गेल्या ८ दिवसांचा विचार केला तर, सोनं आपल्या १,७६,१२१ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून आतापर्यंत २४,६३२ रुपयांनी स्वस्त झालंय. तसंच, चांदी २९ जानेवारीच्या ३,८५,९३३ रुपये प्रति किलो या उच्चांकी स्तरावरून तब्बल १,४४,७४९ रुपयांनी खाली आली आहे.

वाचा सविस्तर

06 Feb, 26 02:15 PM

मुंबईत महायुतीची मोठी खेळी, शरद पवारांच्या नगरसेवकाचा मिळवला पाठिंबा...

मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडून आलेले एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी आज अधिकृतपणे महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

06 Feb, 26 02:07 PM

शपथविधीवरून खालचे राजकारण करणं बंद झालं पाहिजे - मुख्यमंत्री

शपथविधीवरून जो काही वाद-विवाद होतोय हा निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वत:चं राजकारण यात कसं पाहता येईल असा प्रयत्न करतोय हे चुकीचे आहे. शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध मोठे नेते असलेले अजित पवार दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले. पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्यांच्या माध्यमातून जे काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचे आहे. अशा प्रकारचे खालचे राजकारण बंद झाले पाहिजे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी कार्यक्रमावरून विरोधकांसह शिंदेसेनेच्या मंत्र्‍यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांना मुख्यमंत्र्‍यांनी फटकारले आहे. 

06 Feb, 26 02:03 PM

मुंबई लोकलमधील सहप्रवाशाचा दगड मारून डोळा फोडणाऱ्या आरोपीला अटक

वांद्रे रेल्वे स्थानकावर दोन प्रवाशांच्या वादात तिसऱ्याच व्यक्तीच्या डोळ्याला दगड लागून त्याचा एक डोळा निकामी झाला होता. निशांत रत्नाकुमार खत्री (२८) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. त्याला दगड मारणारा आरोपी योगेंद्र बौड याला वांद्रे रेल्वे पोलीसांनी अटक केली.

06 Feb, 26 01:44 PM

आता बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही? हे सांगता येत नाही: बजरंग सोनावणे

दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मी भाष्य करणार नाही, कारण ती वेळ नाही. दादा मला हेलिकॉप्टरमध्ये काय बोलले हे मी सांगणार नाही. पण दादा जे काय बोलले ते अपूर्ण राहू नये, असे आम्ही काम करणार आहोत. राजकारणावर बोलण्याची वेळ नाही. दहा दिवस दुखवटा असल्याने माध्यमांशी बोललो नाही. दादांचा आम्हाला मोरल सपोर्ट होता. आता बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही? हे सांगता येत नाही, असेही बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.

06 Feb, 26 01:42 PM

अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे: बजरंग सोनावणे

अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा तपास सार्वजनिक करा. पायलट कोण होता याची चौकशी झाली पाहिजे. घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनचे CCTV फुटेज दाखवले गेले पाहिजे. विमान वरच क्रॅश झाले. वर विमान ब्लास्ट का झाले? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला.
 

06 Feb, 26 01:40 PM

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनावणेंना शंका

अजितदादांच्या अपघाताच्या घटनेबाबत वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेचा तपास झाला पाहिजे. घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत. विमानात ६ लोक होते, मग ५ मृतदेह कसे मिळाले? ज्या प्रकारे अपघात झाला, त्या विमानात बॉम्ब होता का? हे पाहिले पाहिजे, अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली.

06 Feb, 26 12:57 PM

प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून मार्चपर्यंतची डेडलाइन निश्चित

पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पूल मार्चपर्यंत पूर्णपणे पाडण्याचे लक्ष्य आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेचे ब्लॉक अजून ठरत नसल्याने त्यांच्या हद्दीतील कामाला सुरुवात झालेली नाही. सविस्तर माहिती...

06 Feb, 26 12:22 PM

मुंबई मनपा मुख्यालयात भाजपचे नवे पक्ष कार्यालय...

मुंबई महानगरपालिकेत आज भाजपच्या नव्या पक्ष कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रांगोळी काढलेली पाहायला मिळाली. ज्यावर मुंबई शहराच्या सुवर्ण युगाची सुरुवात असं लिहिलं आहे. पाहा LIVE आढावा...

06 Feb, 26 12:22 PM

महाराष्ट्रातील १८ वर्षीय पीडितेला न्याय; ३० व्या आठवड्यात गर्भपात करण्यास कोर्टाची मंजुरी

महाराष्ट्रातील एका १८ वर्षीय लैंगिक अत्याचार पीडितेच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. पीडितेचा गर्भ ३० आठवड्यांचा असतानाही, न्यायालयाने तिला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. कोणत्याही स्त्रीची इच्छा नसेल, तर तिला गर्भधारणा पूर्ण करण्यास न्यायालय सक्ती करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले. संबंधित गर्भ हा लैंगिक अत्याचारातून राहिलेला असून, आईला तो नको असल्याने तिचा निर्णय अंतिम मानला जावा.
 

06 Feb, 26 12:20 PM

माझ्या नादाला लागू नका, मी छत्रपतींची औलाद; शिवेंद्रराजेंचा विरोधकांना इशारा

मी माझा मतदारसंघ आणि तालुका सोडून कुठे जात नाही. काही जण स्वप्ने पाहतायेत पण त्यांना ठासून सांगतो, २०२९ ची स्वप्ने जावळीत बघू नका. शेवटी या मतदारसंघाची पुनर्रचना करणारा एकच बॉस आहे त्यांचे नाव देवेंद्र फडणवीस..त्यामुळे कसे मतदारसंघ तयार करायचे हे आम्हाला चांगले माहिती आहे. तुम्हाला सोय हवी असेल तर आम्हाला भेटा. पण गरज नसताना मला जर कुणी डिवचले, माझ्या नादाला जर कुणी लागले तर मीसुद्धा छत्रपतींची औलाद आहे लक्षात ठेवा असा इशारा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना दिला. 
 

06 Feb, 26 12:19 PM

मुंबई: गोरेगाव-सीएसएमटी हार्बरमार्ग ३ महिने बंद

पश्चिम रेल्वे मार्गावर ५व्या, ६ व्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. नव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे-खार रेल्वेपूल पाडून त्याच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. वाचा सविस्तर...

06 Feb, 26 11:54 AM

Bitcoin अडीच वर्षांच्या नीचांकी स्तरावर

गेल्या दोन दिवसांपासून क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या 'बिटकॉइन'चा भाव १२.६ टक्क्यांनी घसरून ६३,३०० डॉलरवर आला होता. ऑक्टोबर २०२४ नंतरची ही सर्वात नीचांकी पातळी असून नोव्हेंबर २०२२ च्या बाजार उलथापालथीनंतरची ही सर्वात मोठी दैनंदिन घसरण ठरली.

वाचा संपूर्ण बातमी

06 Feb, 26 11:42 AM

मुंबई महापालिकेत शरद पवार गटाच्या नगरसेवकाची महायुतीला साध

BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीआधीच राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याने मुंबईत महायुतीची ताकद वाढली आहे. रावराणे हे मुंबई महापालिकेतील अनुभवी नाव असून त्यांनी यापूर्वी प्रभाग समिती अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

06 Feb, 26 11:32 AM

बिहार निवडणुकीचा निकाल रद्द करा, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेत मतदारांना १५,६०० कोटी रुपयांची रोकड वाटून निवडणूक बेकायदेशीरपणे जिंकल्याच्या कारणावरून २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांना या मागणीसाठी उच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली. "आम्ही अशा प्रकारे नोटीस जारी करू शकत नाही. यासाठी एक प्रक्रिया आहे. ही केवळ एक निवडणूक याचिका आहे. तुम्ही निवडणूक हरलात म्हणून संपूर्ण निवडणुकीचा निकाल रद्द करण्याची मागणी करत आहात. जर तुम्हाला जनतेने नाकारले आहे तर दिलासा मिळवण्यासाठी कोर्टात येणे हे योग्य नाही असं मत न्यायाधीशांनी नोंदवले. 

06 Feb, 26 11:20 AM

पनवेल महानगर पालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील; प्रमिला पाटील होणार उपमहापौर

पनवेल महानगरपालिकेत महापौरपदाचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने नितीन पाटील यांना महापौरपद तर प्रमिला पाटील यांना उपमहापौरपदी निवडण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विशेष बाब म्हणजे, पनवेल नगरपालिकेच्या निवडणुकीत नितीन पाटील हे सर्वप्रथम बिनविरोध निवडून आले होते. त्यांच्याविरोधात असलेल्या उमेदवाराच्या अर्जात त्रुटी असल्याचे सांगत त्याचा अर्ज बाद करण्यात आला होता.

06 Feb, 26 11:15 AM

ओला, उबर, रॅपिडो चालकांचा शनिवारी संप; प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता

ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कॅब, बाईक आणि ऑटो सेवा देणाऱ्या चालकांच्या युनियननं शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी संपाची घोषणा केली आहे. तेलंगण गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, संपूर्ण भारतातील ॲप-आधारित ट्रान्सपोर्ट वर्कर्स या संपात सहभागी होणार आहेत. 

वाचा संपूर्ण बातमी

06 Feb, 26 11:08 AM

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड स्पर्धेतून बाहेर

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त न होऊ शकल्याने T20 World Cup 2026 मधून बाहेर झाला आहे. त्याने स्पर्धेतून माघार घेतली असली तरीही त्याच्या जागी कोणताही बदली खेळाडू निवडला जाणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे.

06 Feb, 26 10:24 AM

रेपो दरात कोणताही बदल नाही, ईएमआयचा भार कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (MPC) वर्षातील पहिली बैठक आज, ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. यावेळी त्यांनी रेपो दरात कोणतेही बदल न करता जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यापूर्वी तज्ज्ञांनीही रेपो दरात कोणतेही बदल होणार नाहीत, असं मत व्यक्त केलं होतं. 

वाचा संपूर्ण बातमी

06 Feb, 26 10:16 AM

मुंबई: गोरेगाव-सीएसएमटी हार्बरमार्ग ३ महिने बंद

पश्चिम रेल्वे मार्गावर ५व्या, ६ व्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. नव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे-खार रेल्वेपूल पाडून त्याच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. वाचा सविस्तर...

06 Feb, 26 10:15 AM

पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता "परीक्षा पे चर्चा" (पीपीसी) कार्यक्रमादरम्यान देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. २०२६च्या या नवव्या आवृत्तीत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान तणावमुक्त राहण्यास आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करण्यासाठी टिप्स दिल्या.

06 Feb, 26 09:48 AM

शरद पवार अजितदादांच्या 'सहयोग' निवासस्थानी पोहचले

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीतल्या त्यांच्या सहयोग निवासस्थानी गेल्या. मागील २-३ दिवसांपासून बारामतीत पवार कुटुंबातील सदस्यांच्या बैठका सुरू आहेत. शरद पवारही दिल्ली दौरा रद्द करून मुंबईहून बारामतीत गेले होते. त्यानंतर बारामतीत पवार कुटुंबाच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यात आज शरद पवार दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सहयोग निवासस्थानी बैठकीसाठी गेले आहेत. 

06 Feb, 26 09:49 AM

"सुनेत्रा काकींनी अध्यक्ष राहावे हीच सर्वांची इच्छा"; रोहित पवारांचे महत्त्वाचे विधान

"गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. मी ९ फेब्रुवारीनंतर स्पष्टपणे बोलेन. दादांची इच्छा काय होती? युती होणार की नाही, यावर भाष्य करण्याइतका मी मोठा नाही. महाराष्ट्रात सध्या चर्चा सुरू आहेत हे ऐकून वाईट वाटते. सर्वांना वाटते की सुनेत्रा काकी (सुनेत्रा पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदी राहाव्यात. सुनेत्रा काकी आमदारांची, कुटुंबाची, लोकांची आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मते विचारात घेऊनच बोलतील," असं रोहित पवार म्हणाले.

06 Feb, 26 09:46 AM

मुंबई हादरली! मूकबधिर तरुणीवर अत्याचार करणारा नराधम अखेर जेरबंद

मुंबईत मूकबधिर तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. १६ जणांच्या डीएनए चाचणीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी दुसरी तिसरा कोणी नसून घरातीलच व्यक्ती आहे. वाचा सविस्तर....

06 Feb, 26 09:32 AM

LIVE: पुणे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच-गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन, सर्व स्तरातून टीका

अजित पवार यांच्या निधनाला १० दिवसही झालेले नाहीत. तशातच पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच-गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 तारखेला महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयावर टीका करण्यात येत आहे.

06 Feb, 26 09:10 AM

रेपो दर कमी होणार की जैसे थे राहणार, सामान्यांना दिलासा मिळणार का?

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज ६ फेब्रुवारी रोजी त्यांचे MPC निर्णय जाहीर करणार आहे. केंद्रीय बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीची (MPC) बैठक बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यांचे धोरणात्मक निर्णय आज जाहीर केले जातील. २०२६ च्या आर्थिक वर्षासाठी हा अंतिम धोरण आढावा असेल. EMI कमी होतील का, कर्जे स्वस्त होतील का, की रेपो दरात कपात होणार नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

06 Feb, 26 08:35 AM

ओला, उबर, रॅपिडो चालकांचा शनिवारी संप; प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता

ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कॅब, बाईक आणि ऑटो सेवा देणाऱ्या चालकांच्या युनियननं शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी संपाची घोषणा केली आहे. तेलंगण गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, संपूर्ण भारतातील ॲप-आधारित ट्रान्सपोर्ट वर्कर्स या संपात सहभागी होणार आहेत. 

वाचा संपूर्ण बातमी

06 Feb, 26 08:29 AM

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर पुन्हा वाहतूककोंडी; बोरघाटात अनेक वाहने बंद पडली, वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा एकदा वाहतूककोंडी झाल्याचे चित्र आहे. अनेक वाहने बोरघाटात बंद पडलेली आहेत. घाटात गाड्या बंद पडल्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. जोपर्यंत त्या गाड्या हटवल्या जाणार नाहीत, तोपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नाही, असा अंदाज व्यक्त होत आहे.

06 Feb, 26 08:19 AM

"मीच भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा एका दिवसात दोन वेळा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केला. एकाच दिवसात चक्क दोन वेळा त्यांनी या दाव्याचा पुनरुच्चार केला आहे. याआधी ट्रम्प यांनी जेव्हा जेव्हा असा दावा केला, त्यावेळी भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र सातत्याने याचा उल्लेख सुरुच ठेवला आहे. वाचा संपूर्ण बातमी

06 Feb, 26 08:17 AM

मणिपुरात नवीन सरकार स्थापन होताच तणावाची स्थिती

मणिपूरच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर, गुरुवारी पुन्हा तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. राज्यातील चुराचांदपूर जिल्ह्यात नवीन सरकारविरुद्ध निदर्शनं सुरू झाली, ज्यामुळे तुईबोंग परिसरात तणाव निर्माण झाला. दिवसभर परिस्थिती तणावपूर्ण राहिली, ज्यामुळे निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण संघर्ष झाला. परिस्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाRahul Gandhiराहुल गांधीAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारSharad Pawarशरद पवारT20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६