Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Gold Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण; चांदी एका झटक्यात १३,१५५ रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दरही उतरले, पाहा नवे दर

Gold Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण; चांदी एका झटक्यात १३,१५५ रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दरही उतरले, पाहा नवे दर

Gold Silver Price 6 Feb 2026: सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. पाहा काय आहेत नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:30 IST2026-02-06T14:11:18+5:302026-02-06T14:30:54+5:30

Gold Silver Price 6 Feb 2026: सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Rate 6 February 2026 Gold and silver prices fall again Silver becomes cheaper by Rs 13155 in one go gold prices also fall see new rates | Gold Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण; चांदी एका झटक्यात १३,१५५ रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दरही उतरले, पाहा नवे दर

Gold Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण; चांदी एका झटक्यात १३,१५५ रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दरही उतरले, पाहा नवे दर

Gold Prices and Silver Prices : सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर १,०१३ रुपयांनी स्वस्त झाले आहेत, तर चांदीच्या दरात १३,१५५ रुपयांची मोठी घसरण झाली आहे. गेल्या ८ दिवसांचा विचार केला तर, सोनं आपल्या १,७६,१२१ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून आतापर्यंत २४,६३२ रुपयांनी स्वस्त झालंय. तसंच, चांदी २९ जानेवारीच्या ३,८५,९३३ रुपये प्रति किलो या उच्चांकी स्तरावरून तब्बल १,४४,७४९ रुपयांनी खाली आली आहे.

आजचे ताजे दर (जीएसटीसह आणि विना जीएसटी)

आज सराफा बाजारात विना जीएसटी सोनं १,५१,४८९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडलं, तर चांदीचा दर प्रति किलो २,४१,१८४ रुपये इतका राहिला. जीएसटीसह सोन्याचा भाव १,५६,०३३ रुपये आणि चांदी २,४८,४१९ रुपयांवर आली आहे. याव्यतिरिक्त, प्लॅटिनमच्या दरातही २,५९६ रुपयांची घट होऊन तो ६३,३५७ रुपयांवर पोहोचला. गुरुवारी बाजार बंद होताना विना जीएसटी चांदी २,५४,३३९ रुपयांवर आणि सोनं १,५२,५०२ रुपयांवर होते. हे दर 'आयबीजेए' (IBJA) द्वारे जाहीर करण्यात आलेत.

हावडा किंवा मुंबई नव्हे, तर 'हे' आहे देशातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्थानक; ३३०० कोटींपेक्षा अधिक आहे कमाई

१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव

२२ कॅरेट सोनं: ९२८ रुपयांनी स्वस्त होऊन १,३८,७६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं. जीएसटीसह याची किंमत १,४२,९२६ रुपये झाली.
१८ कॅरेट सोनं: ७६० रुपयांच्या घसरणीसह आज १,१३,६१७ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले असून जीएसटीसह हा दर १,१७,०२५ रुपये इतका आहे.

१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे दर

२३ कॅरेट सोनं: १,००९ रुपयांनी घसरून १,५०,८८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत १,५५,४०८ रुपये झाली.
१४ कॅरेट सोनं: ५९३ रुपयांच्या घसरणीसह ८८,६२१ रुपयांवर उघडलं असून जीएसटीसह हे सोनं ९१,२७९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उपलब्ध होईल.

Web Title : सोने-चांदी की कीमतों में फिर भारी गिरावट; नवीनतम दरें देखें।

Web Summary : सोने और चांदी की कीमतों में भारी गिरावट दर्ज की गई। सोना ₹1,013 गिरा, जबकि चांदी ₹13,155 लुढ़की। सोना अब अपने शिखर से ₹24,632 सस्ता है। जीएसटी के बिना, सोना ₹1,51,489 प्रति 10 ग्राम और चांदी ₹2,41,184 प्रति किलो पर खुली।

Web Title : Gold and silver prices plummet again; check the latest rates.

Web Summary : Gold and silver prices witnessed a sharp decline. Gold fell by ₹1,013, while silver crashed by ₹13,155. Gold is now ₹24,632 cheaper than its peak. Without GST, gold opened at ₹1,51,489 per 10 grams, and silver at ₹2,41,184 per kg.