शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:23 IST

Maharashtra Local Body Election: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यााबबतचं कारणंही समोर येत आहे. 

येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार उडणार आहे. या निवडणुका जवळ आल्याने स्थानिक पातळीवरील सर्वच इच्छुकांनी जोरदार मोर्चेंबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकांपूर्वीची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आली असून, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठीचं आरक्षणही जाहीर झालं आहे. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यााबबतचं कारणंही समोर येत आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयारी करण्याती मुदत राज्य निवडणूक आयोगाकडून वाढण्यात आली आहे. आधी २७ ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी ही अंतिम करायची होती. मात्र आता ही प्रक्रिया १२ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ३ नोब्हेंबरपर्यंतच्या मतदार याद्या ह्या अधिप्रमाणित केल्या जातील. तसेच  १२ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही वेळ लागणार असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडू शकतात. तसेच मुसळधार पावसामुळे राज्यातील काही भागात आलेला पूर आणि शेतीचं झालेलं नुकसान यांचे पंचनामे आणि इतर शासकीय प्रक्रिया सध्या सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक थोडी पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यामधील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका सुरुवातीला होतील. त्यानंतर पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या जातील, अशी शक्यता आहे. साधारणत: डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातील या निवडणुका होऊ शकतात.  

English
हिंदी सारांश
Web Title : Zilla Parishad, Panchayat Samiti Elections Likely Delayed: Here's Why

Web Summary : Zilla Parishad and Panchayat Samiti elections may be postponed due to extended voter list preparation and ongoing flood relief efforts. The election commission has extended voter list deadline to November 12. Municipal elections will precede rural polls, potentially in late December or January.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्रVotingमतदान