पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:17 IST2025-10-08T16:16:08+5:302025-10-08T16:17:23+5:30

BJP Chandrakant Patil News: मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली.

maharashtra government relief for students in flood affected areas a decision to waive exam fees | पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय

BJP Chandrakant Patil News: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी  पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून  परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या सोबतच  शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांचे साहित्य आणि शैक्षणिक साधने पूरामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठे आणि खाजगी शिक्षण संस्थांनी  विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश अशा स्वरूपात सामाजिक कर्तव्य म्हणून मदत करावी. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहील, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, तसेच राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

 

Web Title : बाढ़ प्रभावित छात्रों के लिए सरकार की राहत: परीक्षा शुल्क माफ

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने बाढ़ प्रभावित छात्रों के लिए परीक्षा शुल्क माफ किया। मंत्री चंद्रकांत पाटिल ने शिक्षण संस्थानों से किताबें और वर्दी के साथ मदद करने का आग्रह किया। छात्रों की कठिनाइयों की समीक्षा के लिए एक बैठक में निर्बाध शिक्षा और समर्थन पर जोर दिया गया।

Web Title : Government Relief for Flood-Affected Students: Exam Fees Waived

Web Summary : Maharashtra government waives exam fees for flood-hit students. Minister Chandrakant Patil urges educational institutions to aid with books and uniforms. A meeting reviewed student difficulties, emphasizing uninterrupted education and support.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.