शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 13:56 IST

Maharashtra News: बाळासाहेब थोरात अन् पृथ्वीराज चव्हाणांसारख्या दिग्गजांनाही भाजपसमोर हार पत्करावी लागली.

Maharashtra Assembly Election Result 2024 Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने न भूतो न भविष्यती अशी दमदार कामगिरी केली. 230+ जागा मिळवून महायुतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अनेक राजकीय विश्लेषकांनी आणि एक्झिट पोल्सनी चुरशीच्या लढतीची शक्यता व्यक्त केली होती, पण निकालाच्या सुरुवातीपासून महायुतीने स्तुनामी आणली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती, तिथे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

काँग्रेस चारीमुंड्या चीतराज्यातील बहुतांश जागांवर शिवसेना vs शिवसेना, राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी आणि भाजप vs काँग्रेस, अशी लढत होती. राज्यातील 288 पैकी 75 मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती. या 75 पैकी भारतीय जनता पक्षाने 65 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला फक्त 10 जागा जिंकत आल्या. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका बसला होता. पण, त्यानंतर भाजपने दमदार कमबॅक करत काँग्रेसला चारीमुंड्या चीत केले. 

महाराष्ट्रात भाजपची सर्वोत्तम कामगिरीया विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 132 जागा जिंकून सर्वांनाच धक्का दिलाय. ही भाजपची महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 105 जागा जिंकल्या होत्या. तर दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केली आहे. 2019 मध्ये 44 जागा आणि 2014 मध्ये 42 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा फक्त 15 जागा जिंकण्यात यश आले आहे.

या कारणांमुळे भाजपचा विजय या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे श्रेय संयुक्त आणि समन्वित प्रचाराला दिले जात आहे. यामध्ये राज्य आणि केंद्राच्या नेत्यांनी एकत्र काम केले. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य युनिटचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढत होते, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांसारख्या अनुभवी नेत्यांच्या सभांमुळे मतदार एकवटला. 

संघाचे स्थानिक पातळीवर कामविशेष म्हणजे, या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विशेष काम केले आहे. RSS ने राज्यभरात 60,000 हून अधिक सभांचा समावेश असलेल्या व्यापक मोहिमेद्वारे तळागाळातील लोकांचे समर्थन मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रयत्नामुळे मते एकत्रित करण्यात आणि विरोधकांनी अवलंबलेल्या जाती-आधारित रणनीती निष्फळ करण्यात मदत झाली. याशिवाय, भाजपला त्यांच्या सुव्यवस्थित प्रचार यंत्राचाही फायदा झाला, ज्याने प्रभावी उमेदवार निवड, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि मित्रपक्षांशी सुरळीत समन्वय साधला.

काँग्रेसचे अनेक दिग्गज पराभूतएकीकडे भाजपचे सूनियोजित व्यवस्थापन अन् दुसरीकडे काँग्रेसमधील अंतर्गत कलह, तळागाळातील कार्यकर्त्यांमधील वाद आणि विश्वासार्ह नेतृत्वाचा अभाव, यामुळे काँग्रेसला सर्वात जास्त फटक बसला. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, धिरज देशमुख यांच्यासारख्या दिग्गजांनाही आपल्या जागा वाचवता आली नाही. आता कोकण परिसरात काँग्रेसचा एकही आमदार उरलेला नाही. तर, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रत्येकी एक आमदार आहे. खुद्द प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अवघ्या 208 मतांनी निसटता विजय झाला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी