शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:47 IST

Maharashtra Election Result : या निकालावर भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलामध्ये महायुतीला मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. पहिल्या कलानुसार महायुतीने स्पष्ट बहुमताकडे मुसंडी मारली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या निकालावर भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.

जनतेने महायुतीला विजय मिळवून दिला आहे. त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यामध्ये जे एकत्रितपणे काम केले. त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे. अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष लाभाचे राजकारण या दोन्हींचा समतोल महायुतीच्या सरकारने योग्य ठेवला. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी निवडून दिले आहे, असे विनोद तावडे म्हणाले.

पुढे विनोद तावडे म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जनतेचा विश्वास बसला आहे. भाजपा-शिवेसना नैसर्गिक युती होती. ही युती उद्धव ठाकरेंनी २०१९ ला तोडली. त्याचा राग बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता. तसेच, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर टीका करताना विनोद तावडे यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. रोज सकाळी महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करणारं वक्तव्य भांडूपवरून यायचं. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचं धनुष्यबाण, आणि हिंदुत्त्वाचं शिवसेना नाव हिंदुत्त्वाच्या मूळ प्रवाहात असलेल्या भाजपाबरोबर आणले, असेही विनोद तावडे म्हणाले.

दरम्यान, जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात भाजप १२६ जागांवर, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ५५, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) ३९, काँग्रेस २१ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला १८ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, राज्यात महायुतीने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती