शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

Maharashtra Government: शरद पवारांनी पुन्हा टाकला 'बॉम्ब'; म्हणाले, 'सत्तास्थापनेचं भाजपा-शिवसेनेला विचारा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 11:49 AM

शरद पवार आज दिल्लीत पोहोचले असून, त्यांनी महाशिवआघाडीच्या सरकारबद्दल सूचक विधान केलं आहे.

मुंबईः विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला जनतेनं स्पष्ट बहुमत देऊनही त्यांना अद्याप सरकार स्थापन करता आलेलं नाही. मुख्यमंत्रिपदावरून दोघांचं घोडं असलं असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठकाही सुरू आहेत. राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच खातेवाटप आणि इतर पदांबाबत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत सहमती होणे बाकी आहे, तसेच काँग्रेसबाबतचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याने सरकार स्थापनेस विलंब होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज दिल्लीत पोहोचले असून, त्यांनी महाशिवआघाडीच्या सरकारबद्दल सूचक विधान केलं आहे.पत्रकारांनी शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भाजपाला विचारा, शिवसेना-भाजपा वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत. “काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे. संध्याकाळी सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचंही पवारांनी सांगितलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवणार आहे, असं शिवसेना म्हणत असल्याचं त्यांना विचारल्यावर त्यांनी उपरोधिका प्रतिसाद दिला. शिवसेनेसोबत सरकार बनवणार का याचं उत्तर शिवसेनेलाच विचार, असं म्हणत ते निघून गेले.  त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाशिवआघाडीमध्ये सरकार स्थापण्यावरून चर्चा सुरू असून, पवारांनी असं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून, सरकार चालविण्यासाठी 40 कलमी किमान समान कार्यक्रम निश्चित करून तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडे पाठविला आहे. आता शरद पवार हे स्वत: सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेला सरकारसाठी पाठिंबा देण्याची भूमिका सोनिया गांधी यांनी घ्यावी, यासाठी पवार त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करतील, असे समजते. काँग्रेस व राष्ट्रवादीचे राज्यातील नेते याबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी सातत्याने चर्चा करीत आहेत. काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यास हे सरकार टिकेल, अशी अट राष्ट्रवादीने घातली होती. त्यासाठीच पवार आधी ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी व नंतर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतील.>मुख्यमंत्रिपद सेनेकडेचशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचे खातेवाटपावर जवळपास एकमत झाले असून, 5 वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार असून, सेनेला 16, राष्ट्रवादी 14 तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. शिवाय नगरविकास व अर्थ शिवसेनेकडे, गृहखाते राष्ट्रवादी तर महसूल काँग्रेसकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.>आठवडाभरानंतरच चित्र स्पष्ट होणारआणखी किमान आठवडाभर तरी सत्ता स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट होणार नाही. किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाची सहमती, मंत्रिपदे व महामहांडळांसह अन्य पदांच्या वाटपाचा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अंतिम सहमती होण्यास वेळच लागणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस