शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत शरद पवार म्हणाले, 'आता घाई नाही!'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 8:47 PM

एनडीएतून बाहेर पडलेली शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीकडून वेटिंगवर 

मुंबई: दिवसभर भेटीगाठी, बैठकांचं सत्र सुरू असूनही काँग्रेस, राष्ट्रवादीनं शिवसेनेसोबत जाण्याविषयी कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. एनडीएतून बाहेर पडलेल्या, मोदी सरकारमधील मंत्रिपदं सोडून आलेल्या शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीनं वेटिंगवर ठेवलं आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं आमच्याकडे बराच वेळ आहे. त्यामुळे शिवसेनेबद्दल निर्णय घ्यायला बराच अवधी असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचेशरद पवार यांनी सावध पवित्रा घेतला आहे.मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरवर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रपती राजवट लागू करुन राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. त्यामुळे शिवसेनेबद्दल आम्ही सवडीनं निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी सांगितलं. काँग्रेस, राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवलीय. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दलचा निर्णयदेखील एकत्रच घेऊ, असं पवार म्हणाले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विचारसरणीत फरक आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमांसह अनेक मुद्यांवर चर्चा गरजेची असल्याचंदेखील पवार यांनी म्हटलं. शरद पवारांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेले काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत राज्यपालांच्या कारभारावर सडकून टीका केली. ‘राज्यपालांकडून मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करून मनमानी सुरू आहे. राज्यपालांनी बहुमताचा दावा करण्यासाठी भाजपा, शिवसेनेसह राष्ट्रवादीला निमंत्रित केलं. मात्र काँग्रेसला आमंत्रण देण्यात आलं नाही. राज्यपालांची ही कृती चुकीची आहे,’ असं पटेल म्हणाले. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला आहे. याबद्दलचा निर्णय राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना