शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

Maharashtra Election 2019 : बंडखोरांमुळे निवडणुकीमध्ये सर्वत्र तिरंगी-चौरंगी लढती!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 6:30 AM

सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बंडखोर निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत संपल्यानंतर राज्यातील २८८ मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. काही अपवाद वगळता सर्वत्र तिरंगी आणि चौरंगी लढती होत आहेत. तर दुसरीकडे, बंडखोरी शमविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न झाल्यानंतरही बहुसंख्य मतदारसंघात बंडखोराचे आव्हान कायम आहे. विशेषत: दीपक केसरकर, मदन येरावार आणि संजय राठोड या राज्यमंत्र्यांविरुद्ध बंडखोरांनी शड्डू ठोकला आहे.

सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बंडखोर निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्या विरोधात महेश कोठे, बार्शीत शिवसेनेच दिलीप सोपल यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत, करमाळ्यात शिवसेनेच्या रश्मी बागल यांच्या विरोधात सेनेचे नारायण पाटील, पंढरपूरात राष्टÑवादीचे भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे, मोहोळमध्ये शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर विरोधात शिवसेनेचे मनोज शेजवाल आणि सांगोला मतदारसंघात शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर राजश्री नागणे यांनी बंडखोरी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये शिवसेना उमेदवार आणि राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजप संजय देशमुख, उमरखेडमध्ये भाजप उमेदवार नामदेव ससाने यांच्या विरोधात शिवसेनेचे डॉ. विश्वनाथ विणकरे तर यवतमाळ मतदारसंघात भाजपचे राज्यमंत्री मदन येरावार यांना शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे यांनी आव्हान दिले आहे. आर्णीत भाजपचे उमेदवार डॉ. संदीप धुर्वे यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर प्रा. राजू तोडसाम यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. वणी मतदारसंघात तर भाजपचे संजीवरेड्डी बोदकूरवार यांना विश्वास नांदेकर व सुनील कातकडे या दोन शिवसैनिकांनी आव्हान दिले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीकागलमध्ये भाजपच्या समरजित घाटगे यांनी शिवेसनेच्या संजय घाटगे यांच्या विरोधात बंडखोरी केली असून राधानगरीत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात भाजपच्या राहुल देसाई यांची बंडखोरी कायम आहे. शिरोळमध्ये शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्या विरोधात भाजपच्या अनिल यादव, चंदगडमध्ये शिवसेनेचे संग्राम कुपेकर यांच्या विरोधात शिवसेनेतून अनिरुद्ध रेडेकर यांची तर भाजपमधून शिवाजी पाटील, रमेश रेडेकर आणि अशोक चराटी यांची बंडखोरी. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश पाटील यांचे भाऊ महेश पाटील अपक्ष म्हणून रिंगणात. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात भाजपचे चंद्रकांत जाधव काँग्रेसकडून रिंगणात आहेत.कणकवलीत नीतेश राणेंच्या विरोधात सेना !कणकवलीत भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे सतीश सावंत यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेनेचा ए-बी फॉर्म दाखल केला आहे.याच मतदारसंघात भाजपचे बंडखोर संदेश पारकर यांनी आपला अर्ज मागे घेऊन सावंत यांना पाठिंबा दिल्याने राणे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे सावंतवाडीत शिवसेनेच्या दीपक केसरकरांविरोधात भाजप बंडखोर राजन तेली यांचा अर्ज कायम राहिला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस