शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

'नाय, नो, नेव्हर'... अमित शाह - देवेंद्र फडणवीस भेटीनंतर भाजपाला शिवसेनेविरोधात नवी 'पॉवर'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 3:02 PM

शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपा बॅकफूटवर गेली आहे का, मुख्यमंत्री एकटे पडले आहेत का, असं चित्र निर्माण झालं होतं. पण...

ठळक मुद्देज्या महायुतीला जनतेनं बहुमताचा कौल दिला, त्यातलेच दोन भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.'पदं आणि जबाबदाऱ्या यामध्ये मुख्यमंत्रिपद येत नाही, मुख्यमंत्रीपदावर तडजोड होणार नाही!'

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची कोंडी कधी फुटणार, भाजपा आणि शिवसेनेचं सूत कधी जुळणार की नवंच राजकीय समीकरण पाहायला मिळणार, या प्रश्नांची उत्तरं निकालाला दहा दिवस होऊनही मिळायला तयार नाहीत. कारण, ज्या महायुतीला जनतेनं बहुमताचा कौल दिला, त्यातलेच दोन भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत. शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी सोडायला तयार नाही आणि असं काही ठरलंच नव्हतं, या भूमिकेवर भाजपा ठाम आहे. त्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत भाजपावर रोज नवे 'बाण' सोडत आहेत. त्याला भाजपा नेतृत्वाकडून प्रत्युत्तर दिलं जात नसल्यानं,  ते 'बॅकफूट'वर गेलेत की काय, देवेंद्र फडणवीस एकटे पडले आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चित्र बदललं आहे आणि भाजपा 'फ्रंटफूट'वर खेळू लागल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्रिपद देणार नाही म्हणजे नाही, असंच अमित शहा - फडणवीस बैठकीत पक्कं झाल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यामुळे आता शिवसेनेवरचा दबाव वाढणार आहे.

सरकार नक्की स्थापन होईल असं मुख्यमंत्री म्हणाले; पण 'मुद्द्याचं' नाही बोलले!

संजय राऊतांपाठोपाठ महायुतीतील रामदास आठवलेही घेणार शरद पवारांची भेट, कारण...

विधानसभा निवडणूक निकालानंतर पदं आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्यात येईल, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या घोषणेवेळी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्याचाच आधार घेत, शिवसेना अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद मागतेय. परंतु, पदं आणि जबाबदाऱ्या यामध्ये मुख्यमंत्रिपद येत नाही आणि मुख्यमंत्रिपदाच्या समसमान वाटपाचा शब्द आपण शिवसेनेला दिलेला नाही, यावर आज शाह-फडणवीस भेटीतही शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून समजतं. म्हणजेच, भाजपा 'नाय नो नेव्हर'वर शत प्रतिशत ठाम आहे आणि चेंडू पुन्हा सेनेच्या कोर्टात गेला आहे. 

'उदयनराजे होण्याच्या भीतीनं एकही आमदार फुटणार नाही'

'इथं माझंच मला पडलंय अन् तुम्ही मलाच विचारा, सरकार कुणाचं येणार'- उदयनराजे

महाराष्ट्रात नवं सरकार नक्की स्थापन होईल आणि आम्ही त्याबाबत आश्वस्त आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आत्मविश्वासाने सांगितलं. त्यात त्यांनी ना शिवसेनेचा उल्लेख केला, ना महायुतीचा. सरकार स्थापनेबाबत अनेक जण बोलत आहेत, पण भाजपाचे नेते काही बोलणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेला अवाजवी महत्त्व न देण्याचा किंवा अनुल्लेखाने मारण्याचा भाजपाचा फंडा असल्याचं दिसतंय.   

शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; आमदाराचा खळबळजनक दावा

'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'

भाजपा आपल्या मदतीशिवाय सरकार स्थापन करू शकत नाही, असा निकाल लागल्यानं शिवसेनेनं आपली मागणी मुख्यमंत्रिपदाची लावून धरलीय. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षं वाटून घेण्याचं ठरलं नव्हतं, मुख्यमंत्रिपदावर तडजोड होऊच शकत नाही, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीदरम्यान स्पष्ट केली. तेव्हापासून दोन भाऊ एकमेकांची तोंडंही पाहायला तयार नाहीत. युतीतील चर्चा ठप्प असली, तरी संजय राऊत एकदम फॉर्मात आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवतीर्थावर शपथ घेणार, १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, राज्यपालांची भेट घेणार आहोत, मुख्यमंत्र्यांचा चेहरा थकल्यासारखा वाटतोय, लोकसभेवेळी जे ठरलं होतं ते मान्य करा, अशा डरकाळ्या ते रोज फोडत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेऊन, अजित पवारांना मेसेज पाठवून ते भाजपावर दबाव वाढवताना दिसताहेत. त्यावर भाजपानं कुठलीही प्रतिक्रिया न देणं, हे ठरवून केलं जात असल्याचंच आज स्पष्ट झालं आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा