शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीतील ‘चाणक्य’ सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 4:51 AM

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांनंतर दिल्लीतील भाजप व काँग्रेसच्या ‘चाणक्यां’च्या हाती राजकारणाची सूत्रे गेली आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांनंतर दिल्लीतील भाजप व काँग्रेसच्या ‘चाणक्यां’च्या हाती राजकारणाची सूत्रे गेली आहेत. भाजपचे ‘चाणक्य’ असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकाँग्रेसचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे खासदार अहमद पटेल यांनी या राजकारणात थेट उडी घेतली आहे.भाजपचे चाणक्य अमित शहा आश्चर्यकारकरीतीने शांत राहिले आहेत. बहुधा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अमित शहा पुढाकार घेऊन भाजपची सत्ता स्थापन करतात; परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत अमित शहा यांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य मानले जात आहे. अखेर अमित शहा हा तटस्थपणा सोडून रविवारी दुपारी सक्रिय झाले. त्यांनी तात्काळ भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्रात पाठविले. अमित शहा मुंबईला गेले नाही, तर त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना मार्गदर्शन केले. पंधरा दिवसांत पहिल्यांदा अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात थेट दखल दिली आहे.काँग्रेस आमदारांचा दबावदुसरीकडे काँग्रेस या राजकीय खेळीत दूर राहण्याचा प्रयत्न करीत होते. सेनेच्या नेतृत्वातील सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिल्यास देशातील प्रतिमेवर काय परिणाम होईल, हा मुख्य प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींसमोर होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती; परंतु त्यानंतरही काँग्रेसची भूमिका सेनेसाठी सकारात्मक नसल्याचे स्पष्ट झाले होते. तसे संकेतही पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिले होते. दोन दिवसांमध्ये काँग्रेस आमदारांचा दबाव वाढल्याने काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांना बाहेर पडावे लागले. त्यांनी जयपूरला जाऊन काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केल्याने सोनिया गांधी यांचीही भूमिका सेनेबाबत मवाळ झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शहाAhmed Patelअहमद पटेल