शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: अमित शहांचा शिवसेनेला 'इशारा'; निवडणूक पाच दिवसांवर असताना वाढवलं टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:59 IST

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुती दोन तृतीयांश जागा जिंकणार; अमित शहांना विश्वास

नवी दिल्ली: महाराष्ट्रात सत्ता राखल्यानंतर मुख्यमंत्रीपद भाजपाकडेच असेल, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती दोन तृतीयांश जागा जिंकेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते, असंदेखील शहांनी म्हटलं. त्यामुळे निवडणूक पाच दिवसांवर असताना शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे.भाजपाला विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा मिळतील, याची निश्चित आकडेवारी सध्याच्या घडीला सांगता येणार नाही. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला जास्त जागा मिळतील, असं शहा यांनी 'न्यूज18 नेटवर्कला' दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 164 जागा लढवणारी भाजपा बहुमताचा आकडा गाठू शकेल का, या प्रश्नाला ते अशक्य नाही, असं उत्तर शहांनी दिलं. 'भाजपाचा महाराष्ट्रातील प्रवास अतिशय रंजक आहे. आम्ही 2014 मध्ये स्वतंत्र लढलो आणि राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरलो. त्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. कधीकाळी शेती, गुंतवणूक, सहकार, उद्योग क्षेत्रांमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र यूपीए सरकारच्या 15 वर्षांच्या काळात पिछाडीवर गेला होता. मात्र अवघ्या 5 वर्षांमध्ये आम्ही जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये राज्याला पहिल्या पाचात आणलं,' असं शहा यांनी म्हटलं. 2014 मध्ये भाजपा आणि शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपानं 122 जागा जिंकल्या. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला 22 जागा कमी पडल्या. यानंतर भाजपा, शिवसेनेनं पुन्हा युती केली. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात दोन्ही पक्षांची युती झाली, तेव्हा शिवसेना युतीमधील मोठा भाऊ होता. त्यामुळे शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत कायम भाजपापेक्षा जास्त जागा लढवल्या. मात्र तीस वर्षांमध्ये यंदा प्रथमच शिवसेना भाजपापेक्षा कमी जागा लढवत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे