Maharashtra Crime: अल्पवयीन मुलीवर नृत्यशिक्षकाकडून पुणे, ठाण्यात अत्याचार; जबरदस्तीने धर्मांतर, दोन वेळा लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:00 IST2025-05-27T15:55:11+5:302025-05-27T16:00:36+5:30

Jalgaon Crime news: जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डान्स शिकण्यासाठी आलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आला. याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे धर्मांतरही करण्यात आले. 

Maharashtra Crime: Minor girl raped by dance teacher in Pune, Thane; Forced conversion, married twice | Maharashtra Crime: अल्पवयीन मुलीवर नृत्यशिक्षकाकडून पुणे, ठाण्यात अत्याचार; जबरदस्तीने धर्मांतर, दोन वेळा लग्न

Maharashtra Crime: अल्पवयीन मुलीवर नृत्यशिक्षकाकडून पुणे, ठाण्यात अत्याचार; जबरदस्तीने धर्मांतर, दोन वेळा लग्न

Crime News in Marathi: नृत्य शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकानेच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संतापजनक बाब म्हणजे याचे व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी तिला दिली गेली होती. तसेच धर्मातर करण्यास भाग पाडून जबरदस्तीने तिचा विवाह लावण्यात आला. या प्रकरणी बलात्कार व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

या प्रकरणातील नराधम आरोपीचे नाव जितेंद्र अनिल संदानशिव (वय ३३, रा. फरशी रोड, अमळनेर) असे आहे.

डान्स क्लास लावला अन् सुरू झाले अत्याचार

पीडित अल्पवयीन मुलगी सुरत येथील रहिवासी असून, अमळनेर येथे ती शिक्षणासाठी आली होती. फिर्यादीनुसार सन २०१९ मध्ये महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन असल्याने तिने फिटनेस क्लास संचालक असलेल्या जितेंद्रकडे क्लास लावला होता. 

वाचा >>ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे

त्याने पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

पीडिता पुण्यात आली, आरोपीने तिथेही केले अत्याचार

बारावीनंतर या मुलीने पुणे येथे फार्मसी कॉलेजला प्रवेश घेतला. संशयिताने तिथेही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध केले आणि २८ जून २०२२ मध्ये त्याने ठाणे येथे विवाह लावला. ऑगस्ट २०२२ मध्ये तिला धर्मातर करायला लावत पुन्हा विवाह लावल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. 

यानंतर २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पीडिता तिच्या माहेरी सुरत येथे निघून गेली. याबाबत अमळनेर पोलिसात संशयिताविरुद्ध कलम ३७६ ३७६ (२) (१), ३७६ (२) (न), ३७६ (३) पॉक्सो कायद्यानुसार कलम ३ (अ), ४ (क), ५ (क), ५ (ल), ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकाकडून अत्याचार, पोलिसांनी काय सांगितले?

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना गंभीर इजा पोहोचवणे, तसेच जीवितास धोका निर्माण करणे, वारंवार बलात्कार करणे, वर्चस्व ठेवण्यासाठी अथवा नियंत्रण ठेवण्यासाठी बलात्कार करणे, हे कलम लागू केलेले आहेत.

याप्रकरणी पांडेसरा (सुरत) येथे गुन्हा दाखल आहे. तिथून तो झीरो क्रमांकाने अमळनेरला वर्ग करण्यात आला. संबंधित घटनेचा तपशील आला आहे. त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. चौकशीअंती काय ते निष्पन्न होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.

Web Title: Maharashtra Crime: Minor girl raped by dance teacher in Pune, Thane; Forced conversion, married twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.