शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शिंदे गटाच्या काही मंत्र्यांच्या पदरी निराशाच, महत्त्वाची खाती भाजपकडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 06:51 IST

Maharashtra Cabinet portfolios :  उद्योग, कृषी, आरोग्य ही तीन महत्त्वाची खाती सोडली तर एकही महत्त्वाचे खाते शिंदे गटाकडे आलेले नाही. ही तीन खाती वगळता इतर कमी महत्त्वाची खाती मंत्र्यांना मिळाली.

मुंबई : शिंदे गटाच्या काही मंत्र्यांच्या  पदरी निराशा आली असल्याचे खाते वाटपावरून दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १३ खात्यांचा पदभार आहे. यातील नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प) अर्थात एमएसआरडीसी ही खाती शिंदे यांच्याकडे यापूर्वीही होती. ३ खात्यांव्यतिरिक्त एकही विशेष महत्त्वाचे खाते शिंदे यांच्याकडे नाही. 

 उद्योग, कृषी, आरोग्य ही तीन महत्त्वाची खाती सोडली तर एकही महत्त्वाचे खाते शिंदे गटाकडे आलेले नाही. ही तीन खाती वगळता इतर कमी महत्त्वाची खाती मंत्र्यांना मिळाली. उद्योग खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती. हे खाते उदय सामंत यांना मिळाले. मागील सरकारमध्ये त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते होते. ठाकरे मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील यांच्याकडे असलेले पाणीपुरवठा व स्वच्छता हे खाते त्यांच्याकडे कायम आहे.

मागील मंत्रिमंडळात कृषीमंत्री असलेले दादा भुसे यांच्याकडे बंदरे व खनिकर्म हे अत्यंत कमी महत्त्वाचे खाते आले आहे. अनेकदा हे खाते एखाद्या महत्त्वाच्या खात्याबरोबर दिले जाते. कृषी विभागात अडीच वर्षात भुसे यांनी केलेल्या कामगिरीची चर्चा होती. ते आता अब्दुल सत्तार यांना दिले आहे. वादग्रस्त मंत्री संजय राठोड ठाकरे मंत्रिमंडळात वनमंत्री होते. त्यांना आता अन्न व औषध प्रशासन हे खाते देण्यात आले आहे. संदीपान भुमरे यांच्याकडे यापूर्वीचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन हे खाते कायम ठेवले.

ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्री केल्यानंतरही त्यांच्याकडे आधीचेच कमी महत्त्वाचे राज्य उत्पादन शुल्क खाते दिले. फडणवीस सरकारमध्ये जलसंधारणमंत्री असलेले प्रा. तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण हे खाते दिले आहे. ठाकरे सरकारमध्ये राजेश टोपे यांच्याकडे याची धुरा होती. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर हे फडणवीस सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते. आता त्यांच्याकडे शालेय शिक्षण व  मराठी भाषा विभाग आला आहे.

खातेवाटप...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफगुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छतादादा भुसे : बंदरे व खनिकर्मसंजय राठोड : अन्न व औषध प्रशासनसंदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादनउदय सामंत : उद्योगप्रा. तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणअब्दुल सत्तार : कृषीदीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषाशंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकाससुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायचंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यडॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकासगिरीश महाजन : ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सुरेश खाडे : कामगाररवींद्र  चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षणअतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याणमंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा