शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

Maharashtra Budget 2025: राज्यात चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार; अजित पवारांचा अर्थसंकल्पातून झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:42 IST

Maharashtra Budget, Motor Vehical Tax Hike: व्यक्तिगत मालकीच्या चारचाकी सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरील मोटार वाहन करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पातून अजित पवारांनी हा प्रस्ताव मांडला. 

मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पात सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक येाजनेअंतर्गत २० हजार १६५ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तरतूद २ हजार  कोटी रुपयांनी अधिक आहे. या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा ५ लाख ६० हजार ९६४ कोटी  रुपये व महसुली खर्च ६ लाख ६ हजार ८५५ कोटी रुपये अंदाजित करण्यात आली आहे. त्यामुळे ४५ हजार ८९१ कोटी  रुपये अंदाजित तूट असल्याचं सांगत अजित पवारांनी वाहन कर, मुद्रांक शुल्क वाढीचा प्रस्ताव सादर करत अर्थसंकल्पात मोठा झटका दिला आहे. 

व्यक्तिगत मालकीच्या चारचाकी सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरील मोटार वाहन करांमध्ये वाढ

राज्यात सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर चारचाकी सीएनजी आणि एलपीजी वाहनांवर वाहन प्रकार आणि किंमतीनुसार ७ ते ९ टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते, या कराच्या दरांमध्ये १ टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. यामुळे २०२५-२६ या काळात १५० कोटी रूपयांचा अतिरिक्त महसूल राज्याला मिळणे अपेक्षित आहे. 

त्याशिवाय राज्यात ३० लाखांहून अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव अजित पवारांनी अर्थसंकल्पात मांडला. मोटर वाहन कराच्या कमाल मर्यादेतही २० लाख रूपयांवरून ३० लाखापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याला १७० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल अशी अपेक्षा अर्थमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

तसेच बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एक्सॅव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना एकरकमी वाहन किंमतीच्या ७ टक्के दराने मोटार वाहन कर आकारला जाणार आहे. प्रस्तावित वाहन कर सुधारणेमुळे राज्याला १८० कोटी अतिरिक्त महसूल मिळेल. ७५०० किलो वजनापर्यंतच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर ७ टक्के मोटर वाहन कर, त्यामुळे ६२५ कोटी रूपयांचा अतिरिक्त महसूल राज्याला मिळण्याची अपेक्षा असल्याचं अजित पवारांनी सांगितले.

मुद्रांक शुल्कातही वाढीचा प्रस्ताव

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ४ नुसार, एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एका पेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास पुरक दस्तऐवजांना १०० रूपयांऐवजी ५०० रूपये इतके मुद्रांक शुल्क आकारले जाईल. त्याशिवाय एखाद्या दस्तावर भरावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत सध्या आकारण्यात येणारे शुल्क १०० ऐवजी १००० इतके करण्याचं राज्य सरकारने ठरवले आहे. 

वाहनांच्या किंमतीत होणार वाढ

राज्य सरकारने मोटर वाहन करात वाढ केल्याने येत्या काळात वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. कुठलेही वाहन खरेदी करताना त्याची एक्स शोरूम प्राईस आणि ऑन रोड प्राईस यात फरक आढळतो. शोरूममधून कार प्रत्यक्षात रस्त्यावर येईपर्यंत अनेक कार आकारले जातात. त्यात मोटार वाहन कर हा राज्य सरकार आकारते. त्यात वाढ झाल्यास कारच्या किंमतीतही वाढ होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025TaxकरcarकारBudgetअर्थसंकल्प 2024Maharashtraमहाराष्ट्र