शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुन्हा एकदा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:26 IST

२०१५ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन फडणवीस सरकारने हा पुरस्कार प्रदान केला होता.

ठळक मुद्दे१९९५ मध्ये राज्यात युती सरकार असताना हा पुरस्कार सुरू झाला.१९९७ मध्ये पहिला पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना प्रदान करण्यात आला२०१५ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन फडणवीस सरकारने हा पुरस्कार प्रदान केला होता

मुंबई : राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च सन्मान गेली पाच वर्षे कोणालाही प्रदान करण्यात आलेला नव्हता. आता मात्र हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची भूमिका घेत महाविकास आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख,  राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे शासकीय सदस्य तर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योजपती बाबा कल्याणी, क्रिकेटपटू संदीप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य असतील.

२०१५ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन फडणवीस सरकारने हा पुरस्कार प्रदान केला होता आणि त्यावर वादही झाला होता. त्यानंतर सरकारने हा पुरस्कार कोणालाही दिला नाही. आता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समिती गेल्या पाच वर्षांतील पुरस्कारही जाहीर करणार का, याबाबत उत्सुकता राहील.

१९९५ मध्ये राज्यात युती सरकार असताना हा पुरस्कार सुरू झाला. पहिलाच पुरस्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला, पण बाळासाहेबांनी पुरस्कार स्वीकारण्यास नम्र नकार दिला. राज्यात माझे सरकार आहे आणि मीच पुरस्कार घेणे उचित होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

१९९७ मध्ये पहिला पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना प्रदान करण्यात आला आणि त्यावेळच्या पुलंच्या भाषणाने वादळ निर्माण केले होते. त्याच वेळी धारावीतील एका पुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांनी, ‘ जुने पुलं पाडून आता नवीन पुलं बांधण्याची गरज आहे’, असा टोला हाणला होता.
 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र