शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:56 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आणि लाडक्या बहिणींचे मनापासून आभार मानले आहेत. 

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार, महायुतीने २२० जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार ५८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर अपक्ष १० जागांवर आघाडीवर आहेत. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आणि लाडक्या बहिणींचे मनापासून आभार मानले आहेत. 

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. "मुख्यमंत्रिपदाबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ, ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही. सर्व आकडे येऊदे. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. जसं आम्ही एकजूट होऊन निवडणूक लढलो. तसेच आम्ही त्यावरही एकत्र, एकजुटीने निर्णय घेऊ" असं शिंदेंनी म्हटलं आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Results 2024

"महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो. समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान केलं आहे. गेले दोन-अडीच वर्षे जे महायुतीने काम केलं, त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेने दिली. म्हणून महाराष्ट्रातील जनतेचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. पूर्णपणे आम्ही जे काम केलं त्याची पोचपावती जनतेने दिली" असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

महायुतीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र असून, महाविकास आघाडी चितपट झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे ५७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहेत. सुरुवातीचे कल पाहिल्यास महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेता बसवणेही कठीण झाल्याचे चित्र आहे. 

विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचा असेल, तर कोणत्याही एका पक्षाला २९ जागा निवडून येणे आवश्यक असते. महाविकास आघाडीची १२ वाजेपर्यंतची स्थिती अशी आहे की, काँग्रेस केवळ १८ जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना ठाकरे गट १७ जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १९ जागांवर आघाडीवर आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेता करण्याएवढी मते तरी महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला मिळतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना