शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 11:40 IST

निवडणूक आयोगाकडे नोंदणी असणारा पक्ष उत्तर भारतीय विकास सेनेने दोन दिवसांपूर्वी लॉरेन्सला तुझ्यात भगतसिंग दिसत असल्याचे म्हणत निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती.

महाराष्ट्राच्या निवडणुकीत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला लढविले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणी असणारा पक्ष उत्तर भारतीय विकास सेनेने दोन दिवसांपूर्वी लॉरेन्सला तुझ्यात भगतसिंग दिसत असल्याचे म्हणत निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. आता या पक्षाने निवडणूक आयोगाकडे एबी फॉर्म देण्यासाठी मागणी केली आहे. 

उत्तर भारतीय विकास सेनेचे नेते सुनिल शुक्ला यांनी बाबा सिद्दीकींचा मतदारसंघ असलेल्या पश्चिम बांद्रा मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोईला निवडणुकीत उतरविणार असल्याचे म्हटले आहे. लॉरेन्स बिश्नोईला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एबी फॉर्मची गरज आहे. याचा पुरवठा करावा अशी मागणी शुक्ला यांनी रिटर्निंग अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

लॉरेन्सची सही आम्ही या फॉ़र्मवर घेणार आहोत. त्याने जर मंजुरी दिली तर आम्ही महाराष्ट्र निवडणुकीत आणखी ५० जागांवर उमेदवार देणार आहोत, असे शुक्ला म्हणाले. लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती जेलमध्ये आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येत लॉरेन्सचा हात आहे. शुक्ला यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. शुक्ला हे खार पोलीस ठाण्यात गेले होते. तिथून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जात बलकरण बराड या नावाने एबी फॉर्म मिळण्यासाठी अर्ज केला आहे. लॉरेन्सचे खरे नाव बलकरण बराड असे आहे. 

लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात मुंबई, दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई सुरु केली आहे. दिल्ली पोलिसांनी लॉरेन्स गँगच्या सात गुंडांना अटक केली आहे. तर मुंबई-पंजाब पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनेकांना अटक केली आहे. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूक