शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीला धक्का! भाजपा नेत्याने भाकरी फिरवली? उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 17:33 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सलग दोन निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपाच्या माजी आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पुढे जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची धावपळ होताना पाहायला मिळाली. अनेक ठिकाणच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु, काही ठिकाणी बंडखोरांनी बंडाचा झेंडा कायम ठेवत निवडणूक लढण्याचा निर्धार कायम ठेवल्याचे दिसले. यातच भाजपाच्या माजी आमदारांनी महायुतीला मोठा धक्का दिला. बंडखोरी करून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी थेट शरद पवार गटाला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वपक्षीयांनी आता प्रचार करण्याकडे मोर्चा वळवला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.  राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्य लढत होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान असून, २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. यातच भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु, शरद पवार गटाला पाठिंबा दिल्याने महायुतीला धक्का मानला जात आहे. 

संगीता ठोंबरे यांच्या निर्णयाने महायुतीचे टेन्शन वाढले

केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. संगीता ठोंबरे यांच्या या निर्णयामुळे महायुतीचे टेन्शन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, २०१४ मध्ये संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. परंतु २०१९ च्या निवडणुकीत संगीता ठोंबरे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आता पुन्हा या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkaij-acकेज