शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:24 IST

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: शंभर वर्षाहून मोठी पंरपरा असलेला महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला राज्य माहेत्सवाचा दर्जा देण्यात आला असून महाराष्ट्रातील गणेशोत्सवात यावर्षी पासून शासन थेट सहभागी होऊन हा महोत्स्व  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी तसेच राज्यात गणेशोत्सवात होणाऱ्या  विविध कार्यक्रमांची रुपरेषा आज सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी  विधानसभेत जाहीर केली.

मुंबई - शंभर वर्षाहून मोठी पंरपरा असलेला महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला राज्य माहेत्सवाचा दर्जा देण्यात आला असून महाराष्ट्रातील गणेशोत्सवात यावर्षी पासून शासन थेट सहभागी होऊन हा महोत्स्व  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी तसेच राज्यात गणेशोत्सवात होणाऱ्या  विविध कार्यक्रमांची रुपरेषा आज सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी  विधानसभेत जाहीर केली.

विधानसभेत सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड आश‍िष शेलार यांनी जाहीर केलेल्या  निवेदनात म्हटले  आहे की,  महाराष्ट्र ही कला, संस्कृती व परंपरेची समृद्द भूमी आहे. संत-सुधारकांचा, थोरांचा-विरांचा,भक्तीचा-अध्यात्माचा आणि सर्वसमावेशकतेचा वारसा या भूमीला लाभलेला आहे.

दख्खनची ही पवित्र माती वैचारिक प्रकल्गभतेने ओतप्रेत भारलेली असून, राज्याच्या आर्थिक/ सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचा पाया सामाजिक एकरुपतेने घातलेला आहे. ही एकरूपता निर्माण होण्यासाठी गणेशोत्सवाने मोलाची भूमिका पार पडलेली आहे. शेकडो वर्षाची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षापासूनची सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतिक व सामाजिक समरसतेचे मानबिंदूच आहेत.

याच मानबिंदूच महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड व्हावी सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर आधारित व्हावे यासाठी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे.

गणेशोत्सवाचे परंपरागत स्वरूप कायम ठेवून त्यास आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि राज्याचा प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या या महोत्सवाशी जोडला जाण्यासाठी राज्य महोत्सव होणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र शासन सुलभकर्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल.

यावर्षी गणेशोत्सवात असा असेल महाराष्ट्र शासनाचा सहभाग

- राज्य महोत्सवाच्या एका लोगोचे अनावरण करण्यात येणार- संपुर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्राची कला व संस्कती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमांतून घडेल. हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाहीतर महाराष्ट्राबाहेर ज्या ठिकाणी मराठी बांधव मोठया प्रमाणात आहेत त्या ठिकाणीही करण्यात ये्ईल.. तसेच मराठी भाषिक बहुल भारताबाहेरील काही देशामध्ये सांस्कृतिक कार्यक्रांचे आयोजन करण्यात येईल.- व्याख्यानमालेचे आयोजन - गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचेही आयोजन - राज्यातील महत्वाची मंदीरे आणि सर्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे यांचे ऑनलाइन दर्शन घरबसल्या यावे यासाठी एक पोर्टल निर्माण करण्यात येईल- उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ अंतर्गत तालुका स्तरावर स्पधेद्वरे विविध पारितोषिके देण्यात येतील.- घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो  व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येईल - ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपरा, कला संकृती दर्शिवलेली आहे अशा चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येईल- गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे काढण्यात येईल- संपूर्ण राज्याभरातून गणपतीविषयक रिल्स स्पर्धा  आयोजित करण्यात येईल- एका ड्रोनशो चे आयोजन करणार- या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशाभर व्हावी यासाठी वृत्तपत्रे वृत्तवाहिन्या रेडिओ आणि समाज माध्यमे यांच्या माध्यमातून देशभरात प्रचार प्रसिद्धी करणार- आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम उपक्रम हाती घेणार- उत्सवाच्या दरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करणार- पारंपारिक भजन व आरती सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप अनुदान देणार-राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन - विर्सजन सोहळयामध्ये आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा व वाहन व्यवस्था उपलब्ध करणार- राज्यात श‍िकत असणाऱ्या देशाबाहेरील विद्यार्थ्याना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी योजना, उपक्रम राबविणार, असे मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारGaneshotsavगणेशोत्सवMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार