शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 07:22 IST

Tiwasa constituency Vidhan Sabha Election 2024: तहसील कार्यालय आवारात नवनिर्मित प्रशासकीय इमारतीत मतमोजणी करण्यात येणार आहे.

तिवसा - तिवसा विधानसभा मतदारसंघाचा भावी आमदार कोण असणार, याचा फैसला आज होणार आहे. यावेळी तिवसा मतदारसंघात महायुतीमहाविकास आघाडी यांच्यात दुहेरी लढत झाली असून, कुणाच्या पारड्यात विजयाचे पान पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदानयंत्रे ठेवलेली स्ट्राँगरूम निवडणूक प्रतिनिधींसमक्ष उघडण्यात येणार असून, त्यासाठी निवडणूक उमेदवार व प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मतमोजणीकरिता एकूण १२ टेबल लावण्यात आले असून, त्यापैकी पोस्टल बॅलेटचे पाच टेबल, ईटीपीबीएसचे दोन टेबल व ईव्हीएम मतमोजणीचे १४ टेबल लावण्यात आले आहेत. या टेबलवर मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्या होणार आहेत. निवडणूक निकालाची उत्सुकता असलेल्या नागरिकांसाठी निकालाबाबत टप्प्याटप्प्याची माहिती जाणून घेण्यासाठी तिवसा येथील दिवाणी न्यायालयाच्या मागच्या मैदानात व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी दिली

नवीन इमारतीत होणार मतमोजणी

तहसील कार्यालय आवारात नवनिर्मित प्रशासकीय इमारतीत मतमोजणी करण्यात येणार आहे. तेथे मतमोजणी व निवडणूक निकालासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी तयारी करण्यात आली.

तर्कवितर्कांना उधाण

यंदा कोण निवडून येणार याबाबत प्रत्येकाकडून तर्कवितर्क लावण्यात येत आहे. महायुतीच्या उमेदवाराला खरंच लाडकी बहीण साथ देणार, की आपल्या लाडक्या बहिणीसाठी जिवाचे रान करणाऱ्या भावांच्या प्रयत्नांना यश येणार, हे शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Yashomati Thakurयशोमती ठाकूरcongressकाँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती