Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:07 IST

JSW MG Motor India : विक्रीत बंपर वाढ...प्रत्येक १० पैकी ९ इलेक्ट्रिक कार्सची विक्री!

JSW MG Motor India : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी वाढली असून, रस्त्यावर आता इलेक्ट्रिक कार आणि बाईक/स्कूटरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण वाहन विक्रीमध्ये EV चा वाटा अजूनही मर्यादित असला, तरी काही कंपन्यांनी या क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. त्यात विशेषतः JSW MG Motor India ने उल्लेखनीय कामगिरी करत बाजारात खळबळ माजवली आहे.

EV विक्रीत MG ची आघाडी

इलेक्ट्रिक आणि पारंपरिक (पेट्रोल-डिझेल) वाहनांची विक्री करणाऱ्या बहुतांश कंपन्यांमध्ये EV चा वाटा कमी आहे. मात्र MG Motor India च्या बाबतीत चित्र वेगळे आहे. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी तब्बल ८५.८% विक्री इलेक्ट्रिक वाहनांची आहे. म्हणजेच, प्रत्येक १० पैकी ९ इलेक्ट्रिक गाड्या विकल्या जात आहेत. वित्तीय वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीने एकूण ७२,९२५ प्रवासी वाहने विकली, त्यापैकी ६२,५९१ युनिट्स EV होत्या.

स्पर्धक कंपन्यांपेक्षा वेगळी कामगिरी

इतर ऑटो कंपन्यांच्या तुलनेत MG ची EV मध्ये मजबूत पकड दिसते. या क्षेत्रात Tata Motors EV चा वाटा सुमारे १४%, तर Mahindra EV चा वाटा सुमारे ८% आहे. यावरून MG ने EV सेगमेंटमध्ये स्पष्ट आघाडी घेतल्याचे दिसते.

‘Windsor EV’ ने बदलले समीकरण

MG च्या यशामागे MG Windsor EV या मॉडेलचा मोठा वाटा आहे. मागील १२ महिन्यांत या कारच्या ४४,३५२ युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये या मॉडेलचा वाटा ६१% आहे. 

मासिक विक्रीतही दमदार प्रदर्शन

फेब्रुवारी २०२६: ३,६४२ युनिट्स (७३% EV)मार्च २०२६: ५,६२३ युनिट्स विक्री, ६,५२८ युनिट्स होलसेल डिस्पॅच

‘Windsor EV’ ची विक्री वर्षभर सातत्याने मजबूत राहिली:

जुलै २०२५- ४,३०८ युनिट्सऑगस्ट २०२५- ४,५११ युनिट्ससप्टेंबर २०२५- ४,७४१ युनिट्सऑक्टोबर २०२५- ४,४४५ युनिट्स

जानेवारी २०२६ मध्ये विक्री थोडी कमी (२,५६७ युनिट्स) झाली, मात्र मार्चमध्ये पुन्हा वाढ होऊन ४,५३० युनिट्सपर्यंत पोहोचली. या आकडेवारीवरून भारतीय EV बाजारात JSW-MG Motor India ने EV मजबूत पकड निर्माण केल्याचे दिसून येते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Electric car demand surges for JSW MG, surpassing Tata, Mahindra.

Web Summary : JSW MG Motor India leads EV sales with 85.8% share, driven by the Windsor EV model. It outsells Tata and Mahindra in the electric vehicle segment. Windsor EV accounts for 61% of JSW MG's total sales, showcasing its strong presence in India's EV market.
टॅग्स :एमजी मोटर्सइलेक्ट्रिक कारवाहन उद्योग