शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 06:24 IST

​​​​​​​Maharashtra Assembly Election 2024 : अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना सना मलिक यांच्याविरुद्ध उमेदवारी 

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी शरद पवार गटाकडून ९ आणि अजित पवार गटाकडून ४ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. सद्यस्थितीनुसार राज्यातील २८८ पैकी ३२ जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होईल, असे चित्र आहे. 

शरद पवार गटाच्या तिसऱ्या यादीत माजी मंत्री रमेश बंग (हिंगणा) यांच्यासह परळीतून राजेसाहेब देशमुख, अणुशक्तीनगरमधून स्वरा भास्करचे पती फहाद अहमद, चिंचवडमधून राहुल कलाटे, भोसरीतून अजित गव्हाणे, माजलगावमधून मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून आतापर्यंत ७६ उमेदवारांची घोषित करण्यात आले. याआधी पहिल्या यादीमध्ये ४५, तर दुसऱ्या यादीत २२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.

परळीत मुंडेंविरोधात मराठा चेहराराज्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या परळी मतदारसंघात मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाने मराठा कार्ड खेळत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे इथे लोकसभेनंतर पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळेल.

काेणाला कुठे मिळाली संधी?- विद्यमान आमदार नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्याविरोधात अणुशक्तीनगरमधून शरद पवार गटाने समाजवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले, तसेच अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली आहे.- माजलगाव मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात मोहन जगताप यांना संधी देण्यात आली आहे.- चिंचवडमधून भाजपचे शंकर जगताप यांच्या विरोधात राहुल कलाटे, भोसरीमधून अजित पवार गटातून आलेल्या अजित गव्हाणे यांना भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.- मोहोळमधून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या विरोधात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार