शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 20:35 IST

Maharashtra Assembly election 2024: सातारा जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ महायुतीत भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना प्रत्येकी दोन मतदारसंघ मिळणार आहे.

नितीन काळेल,साताराMaharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून सातारा जिल्ह्यातील सहा मतदारसंघाचा तिढा सुटला असला, तरी दोन मतदारसंघाचा घोळ सुरूच आहे. तरीही भाजप आणखी एक मतदारसंघ पदरात पाडून मोठा भाऊ होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी दोन मतदारसंघ येणार आहेत.

विधानसभा जागा वाटपाचे महाविकास आघाडी तसेच महायुतीतील गुऱ्हाळ सुरूच आहे. चर्चेच्या फेऱ्या रंगत आहेत. पण जागांचा तिढा सुटत नाही. सातारा जिल्ह्यातील आठपैकी सहा मतदारसंघांचे उमेदवार निश्चित झालेले आहेत. 

कराड उत्तर आणि फलटणचा तिढा

भाजपने सातारा, माण आणि कऱ्हाड दक्षिणचा उमेदवार जाहीर केला आहे. तर शिंदेसेनेने पाटण आणि कोरेगावच्या शिलेदारांवर शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही वाईचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता कऱ्हाड उत्तर आणि फलटण मतदारसंघ मिळविण्यासाठी महायुतीत बोलणी सुरू आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत यावर तोडगा निघेल, असे सांगण्यात येत होते. पण बैठकांवर बैठका झाल्या तरी तिढा दृष्टिक्षेपात नाही.  

कऱ्हाड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मतदारसंघ हवा आहे. याठिकाणी भाजपच्या एखाद्या नेत्याला प्रवेश देऊन जागा लढविण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी आहे. पण भाजपही या मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नाही. त्यामुळे रस्सीखेचीत मतदारसंघ वाटपाचे घोडे अडले आहे.

फलटणसाठी अजित पवार आग्रही फलटण मतदारसंघ राखीव आहे. याठिकाणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे उमेवार देण्याच्या तयारीत आहेत. पण याठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार होता. 

येथील आमदार दीपक चव्हाण यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तरीही या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. तसेच भाजपलाही मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे फलटण मतदारसंघाचा घोळ संपेना, अशी स्थिती आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना