शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...

By बाळकृष्ण परब | Updated: November 6, 2024 14:09 IST

Maharashtra Assembly Election 2024: सावंतवाडीमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे दीपक केसरकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन तेली अशी मुख्य लढत होत आहे. मात्र महायुतीमध्ये भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले युवा नेते विशाल परब आणि मविआमध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या अर्चना घारे परब यांनी बंडखोरी केल्याने येथील निवडणूक ही चौरंगी झाली आहे.

-बाळकृष्ण परब

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी अगदी रंगतदार लढत रंगण्याची चिन्हे आहेत. शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर हे रिंगणात असल्याने या मतदारसंघाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून हॅटट्रिक करणारे दीपक केसरकर यावेळी विजयी चौकार ठोकण्याच्या इराद्याने रिंगणात उतरले आहेत. मात्र यावेळी दीपक केसरकर यांच्यासमोर अवघड आव्हान आहे. येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात महायुती आणि मविआमधून प्रत्येकी एका इच्छुकाने बंडखोरी केल्याने येथील गणितं बदलली आहे. सावंतवाडीमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे दीपक केसरकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन तेली अशी मुख्य लढत होत आहे. मात्र महायुतीमध्ये भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले युवा नेते विशाल परब आणि मविआमध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या अर्चना घारे परब यांनी बंडखोरी केल्याने येथील निवडणूक ही चौरंगी झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी शमवण्यासाठी वरच्या पातळीवरून फारसे प्रयत्न झाले नाहीत. आता बंडखोरांवर निलंबनाची औपचारिकता पार पडली असली तरी येथे नेमका कुठल्या पक्षाचा पाठिंबा कुणाला आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे येथील विद्यमान आमदार दीपक केसरकर हे सध्या चक्रव्युहात सापडले असून, निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

येथील उमेदवारांवर नजर टाकायची झाल्यास महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर येथून सलग चौथ्यांदा रिंगणात उतरले आहेत. संपूर्ण मतदारसंघात असलेला व्यापक जनसंपर्क, सावंतवाडीसारख्या मोठ्या शहरात असलेला प्रभाव तसेच ग्रामीण भागात छोट्या छोट्या विकासकामांमधून जोडलेला निश्चित समर्थक वर्ग या दीपक केसरकर यांच्या जमेच्या बाजू आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत सहकार्य केल्याने मदतीला आलेले नारायण राणे आणि त्यांचे समर्थक यामुळे सुद्धा केसरकर यांचं बळ वाढलेलं आहे. मात्र सलग १५ वर्षे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आणि सात साडेसात वर्षे मंत्रिपद भूषवल्यानंतरही मतदारसंघातील काही समस्या दीपक केसरकर यांना सोडवण्यात यश आलेलं नाही. येथील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, दर्जेदार रुग्णालयाची वानवा, सावंतवाडी टर्मिनसचं रखडलेलं काम, मायनिंग हे काही केसरकर यांना अडचणीत आणणारे मुद्दे आहेत, तसेच केसरकर यांच्या विरोधकांकडून ते वारंवार उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, दीपक केसरकर यांच्याविरोधात ठाकरे गटाने राजन तेली यांना उमेदवारी दिली आहे. राजन तेली हे काही दिवसांपर्यंत भाजपामध्ये होते. सावंतवाडीची जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटणार हे निश्चित झाल्यानंतर ते भाजपामधून ठाकरे गटामध्ये दाखल झाले आणि त्यांनी उमेदवारी मिळवली. मागच्या दोन निवडणुकांमध्येही तेली यांनी केसरकर यांना आव्हान दिले होते. मात्र त्यात ते अपयशी ठरले होते. यावेळी त्यांनी केसरकर यांना घेरण्याची जोरदार तयारी केली आहे. मात्र भाजपामधून ठाकरे गटात जाताना ते भाजपाच्या येथील संघटनेला फार मोठं खिंडार पाडू शकलेले नाहीत. तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर येथील ठाकरे गटाचं संघटन विस्कळीत झालेलं आहे. मात्र तरीही येथे ठाकरे गटाची बऱ्यापैकी ताकद आहे. त्याशिवाय केसरकरांवर नाराज असलेला मतदार तेलींच्या बाजूने वळू शकतो. एवढंच नाही तर तेली हे बरीच वर्षे भाजपामध्ये असल्याने भाजपाचे काही कार्यकर्तेही वैयक्तिक संबंधातून त्यांच्याकडे वळू शकतात. मात्र राजन तेली हे मुळचे कणकवलीतील आहेत. त्यामुळे बाहेरचे उमेदवार हा शिक्का त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. 

शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि ठाकरे गटाचे राजन तेली यांच्या व्यतिरिक्त दोन अपक्ष उमेदवारांनी सावंवाडीमधील लढतीत रंगत आणली आहे. त्यातील पहिले अपक्ष उमेदवार आहेत ते म्हणजे भाजपाचे बंडखोर नेते विशाल परब. विधानसभा निवडणुकीसाठी विशाल परब यांनी जोरदार तयारी केली होती. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते मतदारांशी जोडून घेत होते. मात्र भाजपाने ही जागा केसरकर यांना सोडल्याने विशाल परब यांनी बंडखोरी केली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रमुख उमेदवारांना धक्का बसेल असं शक्तिप्रदर्शन केलं होतं. विशाल परब यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी भाजपामधील एका वर्गाचा त्यांना पाठिंबा आहे. विशेषत: तरुणवर्ग त्यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशाल परब यांची बंडखोरी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. मात्र विशाल परब हे निवडणुकीच्या राजकारणात नवखे आहेत, त्यात सध्या सिंधुदुर्गात भाजपावर वर्चस्व असलेले नारायण राणे आणि त्यांचे समर्थक विशाल परब यांच्या विरोधात असल्याने ही बाब विशाल परब यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही बंड झालं आहे. मागच्या अनेक वर्षांपासून सावंतवाडीमधून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूक असलेल्या शरद पवार अर्चना घारे परब यांनी ही जागा ठाकरे गटाला गेल्यानंतर बंडखोरी केली आहे. अर्चना घारे परब यांनीही सामाजिक कार्याच्या माध्यमातून या भागात आपली ओळख निर्माण केली होती. मात्र येथे शरद पवार गटाची ताकद मर्यादित असल्याने त्यांचा उमेदवारीवरील दावा कमकुवत झाला. दरम्यान, एक शांत, सुशिक्षित चेहरा म्हणून येथील पांढरपेशा मतदारांमधून अर्चना घारे परब यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तसेच सामाजिक कार्यामुळेही त्यांना बऱ्यापैकी मतदान होण्याची शक्यता आहेत. मात्र त्यांचा एकूण राजकीय वकूब पाहता त्यांची निवडून येण्याची शक्यता मर्यादित आहे. 

एकंदरीत दोन प्रमुख उमेदवार आणि दोन तुल्यबळ अपक्ष उमेदवार अशा चौरंगी लढतीत मतविभाजन हा कळीचा मुद्दा ठरणार  आहे. लोकसभा निवडणुकीत येथून महायुतीला ३० हजारांच्या आसपास आघाडी मिळाली होती. मात्र आता महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन्हीकडे बंडखोरी झाल्याने मतांचं गणित बदलण्याची शक्यता आहे. आता या दोन बंडखोरांपैकी कुठला बंडखोर अधिक मतदान आपल्याकडे खेचतो यावर येथील निकाल अवलंबून असेल. त्यात भाजपाचे बंडखोर असलेल्या विशाल परब यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यास दीपक केसरकर यांची जागा अडचणीत येईल. तर अर्चना घारे परब यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान घेतल्यास राजन तेली डेंजर झोनमध्ये जातील, अशी शक्यता सध्यातरी दिसत आहे.  

येथील चार प्रमुख उमेदवारांची बलस्थानं आणि कच्च्या दुव्यांबरोबरच  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा कलही येथे महत्त्वाचा ठरणार आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ ज्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतो तिथे भाजपाचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे  विनायक राऊत अशी लढत झाली होती. त्यामध्ये नारायण राणे यांनी बाजी मारली होती. तसेच नारायण राणे यांच्या विजयात सावंतवाडीतून मिळालेली तब्बल ३२ हजार मतांची आघाडीही महत्त्वाची ठरली होती. आता बंडखोरीमुळे येथील समीकरणं बदललं आहेत. तसेच आधी भाजपात असलेले राजन तेली आणि बंडखोरी करणारे विशाल परब हे महायुतीची किती मतं खेचतात, यावर येथील निकाल अवलंबून असेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर Rajan Teliराजन तेली