शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मनसेची आज पहिली सभा; राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 11:19 IST

Maharashtra Assembly Election 2024 : डोंबिवली मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही.

Maharashtra Assembly Election 2024 :  डोंबिवली : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (दि.४) पहिली सभा कल्याण ग्रामीणमध्ये होणार आहे. यानिमित्ताने राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. येथील उमेदवार आ. राजू पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा डोंबिवलीतील पी एण्ड टी कॉलनीमधील श्री महावैष्णव मारुती मंदिर येथील चौकात संध्याकाळी ४ वाजता होणार आहे.

डोंबिवली मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही. दरम्यान, मनसेचा आमदार असलेल्या कल्याण ग्रामीणमधून कल्याण लोकसभा निवडणुकीवेळी शिंदेसेनेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरभरून मते मिळाली होती. त्यामुळे परतफेड म्हणून शिंदेसेना या मतदारसंघात उमेदवार उभा करणार नाही, अशी चर्चा होती, मात्र मनसेच्या विरोधात शिंदेसेनेने शहरप्रमुख राजेश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे विरोधकांसह शिंदेसेनेचा समाचार घेतात का? याकडे लक्ष लागले आहे. 

या सभेनंतर राज ठाकरे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे सभा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी वगळता उर्वरीत तीन विधानसभा मतदार संघात उभे असलेल्या मेदवारांनी युती आणि आघाडीसह दिग्गजांसमोर आव्हान उभे केले आहे. यातच आज राज ठाकरे हे अविनाश जाधव यांच्यासह इतर दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी येत असल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

दरम्यान, आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख असून त्यानंतर कोणाच्या लढती कोणासोबत होणार आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होईल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेkalyan-rural-acकल्याण ग्रामीणthane-acठाणे शहरMNSमनसेRaju Patilराजू पाटीलAvinash Jadhavअविनाश जाधव