शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 06:31 IST

Maharashtra Assembly Election 2024: नीतिमत्ता गहाण ठेवून महाराष्ट्रात सत्तेत आलेले राज्यातील भ्रष्ट सरकार गाडण्यासाठी महाविकास आघाडी  मैदानात उतरली असून, सामान्य जनभावना या सरकार विरोधात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जीवनावश्यक पाच वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील, अशी ग्वाही उद्धवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी बुधवारी येथे दिली.

 दर्यापूर (अमरावती) - भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नव्हे तर ‘हम महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे’, असा आहे. नीतिमत्ता गहाण ठेवून महाराष्ट्रात सत्तेत आलेले राज्यातील भ्रष्ट सरकार गाडण्यासाठी महाविकास आघाडी  मैदानात उतरली असून, सामान्य जनभावना या सरकार विरोधात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जीवनावश्यक पाच वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील, अशी ग्वाही उद्धवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी बुधवारी येथे दिली.

दर्यापूर येथे बसस्थानक चौकातील धर्माधिकारी कन्या शाळेच्या पटांगणात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफीसह महिलांना तीन हजार रुपये, तर बेरोजगारांना चार हजार रुपये महिना आमचे सरकार देणार आहे. विविध उद्योगांना महाराष्ट्रातील विविध प्रांतात स्थापन करून बेरोजगारी नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना लढवित असून, यावेळी विजय हमखास असा विश्वाससुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दर्शविला. यावेळी मंचावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे,  माजी खासदार अनंत गुढे, रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची वलगाव आणि बडनेरा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्यात आली.

उद्धवसेनेचा पंचसूत्री वचननामा, २५ लाखांपर्यंत मोफत उपचारमुंबई - महाविकास आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्या जाहीरनाम्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र, शिवसेनेची काही वचने आहेत. ती सरकार आल्यानंतर पूर्ण केली जातील. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार, हे आमच्या जाहीरनाम्यात असल्याचे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.

‘मातोश्री’वर उद्धवसेनेचा पंचसूत्री वचननामा गुरुवारी प्रसिद्ध केल्यानंतर ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राला जी आश्वासने दिली होती ती आम्ही पूर्ण करून दाखवली आहेत. आताही जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो आणि जे बोलतो ते आम्ही करतो. राज्यातील बेरोजगारी दूर करणे, भूमिपुत्रांना नोकरी देणार आहोत.

वचननाम्यात काय?- प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर-गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार- प्रत्येक पोलिस ठाण्याबरोबर स्वतंत्र महिला पोलीस ठाणे सुरु करणार-प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट-जात, पात, धर्म, पंथ न पहाता महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण-सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना -जातनिहाय जनगणना करणार.-धारावीकरांना उद्योगांच्या सोयींसह राहते घर देणार.-रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र उभारणार-बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करणार.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी