शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 06:48 IST

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते; पण अखेर त्यांना संधी देण्यात आली.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : पहिली आणि दुसरी यादी मिळून भाजपने विधानसभेच्या विद्यमान ८८ आमदारांना तिकीट दिले आहे. तसेच, चार विधानपरिषद सदस्यांनाही निवडणूक रिंगणात उतरवून विधानसभेत जाण्याची संधी देण्यात आली आहे. २२ उमेदवारांची दुसरी यादी भाजपने शनिवारी  जाहीर केली. त्यात सात विधानसभा आणि दोन विधानपरिषद सदस्य अशा ९ विद्यमान आमदारांना तिकीट मिळाले आहे. दोन्ही याद्या मिळून पक्षाने १२१ उमेदवार जाहीर केले आहेत.

नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते; पण अखेर त्यांना संधी देण्यात आली. प्रकाश भारसाकळे (अकोट), रविशेठ पाटील (पेण), भीमराव तापकीर (खडकवासला), सुनील कांबळे (पुणे कॅन्टोन्मेंट), समाधान आवताडे (पंढरपूर), कुमार आयलानी (उल्हासनगर) हेही प्रतीक्षेत होते; पण त्यांनाही अखेर संधी मिळाली. वाशिममध्ये लखन मलिक व गडचिरोलीत देवराव होळी या विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला.

पराभूतावर विश्वास आणि निष्ठावंताला संधी
सांगलीच्या शिराळाचे उमेदवार सत्यजित देशमुख हे विधानपरिषदेचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत.  
मलकापूरमध्ये २०१९ मध्ये पराभूत झालेले चैनसुख संचेती यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास टाकला आहे. अकोटमधून उमेदवारी मिळालेले प्रकाश भारसाकळे हे आतापर्यंत सातवेळा आमदार झाले आहेत.
अकोला पश्चिममधून उमेदवारी मिळालेले विजय अग्रवाल हे महापौर राहिले आहेत. या ठिकाणी दीर्घकाळ आमदार राहिलेले गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर आता त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा असताना जुने निष्ठावंत अग्रवाल यांना संधी देण्यात आली.

वेटिंगवर असलेले आमदार : १) हरिष पिंपळे - मुर्तिजापूर २) दादाराव केचे - आर्वी, ३) विकास कुंभारे - मध्य नागपूर ४) डॉ.संदीप धुर्वे - आर्णी ५) नामदेव ससाणे - उमरखेड ६) सुनील राणे - बोरीवली ७) भारती लव्हेकर - वर्सोवा ८) पराग शाह - घाटकोपर पूर्व ९) माळशिरस - राम सातपुते १०) लक्ष्मण पवार - गेवराई (पवार यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.)

शिंदेसेनेत प्रवेश; पण जागा भाजपकडे गेली अन् तिकीट हुकले...
मेळघाटचे ‘प्रहार’चे आमदार राजकुमार पटेल यांनी अलीकडेच शिंदेसेनेत प्रवेश केला होता; पण ही जागा भाजपकडे गेली आणि उमेदवारी काळेंना मिळाली.
वरोरा (जि. चंद्रपूर) येथून उमेदवारी मिळालेले करण देवतळे हे माजी मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचे पुत्र आहेत.
मेळघाटचे उमेदवार केवलराम काळे पूर्वी काँग्रेसचे आमदार होतेे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये गेले.
धुळे ग्रामीणमधील उमेदवार राम भदाणे हे माजी आमदार द. वा. पाटील यांचे नातू आहेत.
विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व रमेश कराड यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविले.
चंद्रशेखर बावनकुळे आणि राम शिंदे या दोन विधानपरिषद सदस्यांना उमेदवारी आधीच देण्यात आली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा