शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 20:20 IST

Maharashtra Assembly Budget Session 2026: आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठा गदारोळ झाला. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठा गदारोळ झाला. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला. तसेच आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी केली. अखेरीस आव्हाड यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.

आज विधान सभेमध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी या विधेयकाला आपला विरोध दर्शवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत उदाहरण देत काही वक्तव्य केलं. आव्हाड यांनी केलेल्या या विधानावर सत्ताधारी बाकांवरून तीव्र आक्षेप घेण्यात आला. शिंदेसेनेचे आमदार आणि मंत्री दादा भुसे, तसेच भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात आक्षेप घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. 

सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेला उल्लेख सभागृहाच्या कामकाजामधून काढून टाकण्याचे आदेश दिले. तसेच जितेंद्र आव्हाड यांना माफी मागण्याची स्पष्ट सूचना दिली. त्यानंतर मी माफी मागतो असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी या विधानाबाबत सभागृहाची माफी मागितली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Awhad's Shivaji Remark Sparks Uproar in Assembly; Ruling Party Aggressive

Web Summary : Jitendra Awhad's statement about Shivaji Maharaj in the Assembly triggered chaos. Ruling party members protested, demanding his suspension. Awhad later apologized. The Speaker ordered the removal of the remarks from records after the uproar during a debate on a religious freedom bill. He then apologized to the assembly.
टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजvidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती