शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये उसळला भीमसागर

By admin | Updated: March 20, 2015 22:45 IST

चवदार तळे सत्याग्रहाच्या ८८ व्या वर्धापनदिनी महाडमध्ये महामानवाला अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महाराष्ट्रातून महाडमध्ये भीमसागर लोटला होता.

महाड : चवदार तळे सत्याग्रहाच्या ८८ व्या वर्धापनदिनी महाडमध्ये महामानवाला अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महाराष्ट्रातून महाडमध्ये भीमसागर लोटला होता. मानवी मूलभूत हक्कासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे पाणी पिऊन पाण्यासाठी सत्याग्रह करीत सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्या ऐतिहासिक दिनाच्या स्मृती समाजात सतत जागृत रहाव्यात यासाठी दरवर्षी महाडमध्ये २० मार्च हा मुक्ती दिन म्हणून साजरा होतो.गुरुवारी चवदार तळे व क्रांतिस्तंभाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी पुष्पहार वाहून अभिवादन केले. माजी आ. माणिक जगताप, महाडच्या नगराध्यक्षा भारती सकपाळ, पं. स. सभापती दीप्ती कळसकर, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, पोलीस उपअधीक्षक शिवाजीराव देशमुख, तहसीलदार संदीप कदम, दलितमित्र मधुकर गायकवाड,बाबाजी साळवे, केशव हाटे या रिपाइं नेत्यांनीही पुष्पहार वाहिला.डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील पुस्तके, सिडीज, किचेन, लॉकेट्स आदी विक्रीची रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटण्यात आली होती. या वस्तू खरेदी करण्यासाठीही भीमसैनिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. बौद्धजन पंचायत समिती सभापती आनंदराज आंबेडकर, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, मनोज संसारे, माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले. महाड नगरपरिषदेतर्फे सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली होती. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. शहरात रिपाइंचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज लावले होते. राष्ट्रीय स्मृती स्मारकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यालाही अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. या स्मारकाला करण्यात आलेली विद्युत रोषणाई खास आकर्षण ठरले होते. (वार्ताहर)