शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
2
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
3
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
4
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
5
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
6
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
7
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
8
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
9
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
10
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
11
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
13
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
14
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
15
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
16
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
17
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
18
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
19
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
20
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू

निवडणुकीला कांद्याची फोडणी, विरोधकांनी उचलला मुद्दा; शरद पवारांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 9:11 AM

माढा लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या येथील प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांना भेदभावाची वागणूक देत असल्याचा आरोपही केला.

करमाळा (सोलापूर) : केंद्र सरकारने गुजरातमधील पाढऱ्या कांद्यावरील निर्यांतबंदी उठवल्याचा मुद्दा आता महाराष्ट्रात प्रचाराचा मुद्दा बनला आहे. विरोधी पक्षांनी यावरून केंद्र सरकारवर टीका करणे सुरू केले आहे. देशभरात कांदा निर्यातबंदी असताना मोदी सरकारने ऐन निवडणुकीत गुजरातमधील दोन हजार मे.टन पांढरा कांदा निर्यातीस मंजुरी देऊन महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यावर अन्याय केला आहे, अशी टीका खासदार शरद पवार केली.

माढा लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या येथील प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांना भेदभावाची वागणूक देत असल्याचा आरोपही केला.  महाराष्ट्रातील निवडणुकीचे दोन टप्पे आता पार पडले आहेत. उरलेल्या तीन टप्प्यातील काही भाग हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे. त्यामुळे या तीन टप्प्यांमध्ये विरोधकांसाठी कांदानिर्यात हा कळीचा मुद्दा असणार आहे. सत्ताधारी यावर कसे उत्तर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हा तर महाराष्ट्रावर अन्यायमहाराष्ट्रात कांदा निर्यातबंदी असताना गुजरातमधील कांद्याला परदेशात पाठवण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय करणारा निर्णय आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे खरे रूप समोर आले असल्याची टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत केली.

गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या २५ टक्केही कांदा पिकत नाही आणि तिथल्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली जाते. महाराष्ट्रातील आमच्या शेतकऱ्यांच्या कांदा असाच सडून जात आहे; पण निर्यातबंदी उठवली जात नाही. एकीकडे महाराष्ट्रातील जनतेची मते मिळवण्यासाठी रोज सभा घ्यायच्या, गोड बोलून त्यांना आकर्षित करायचे.

त्यांच्या अडचणींकडे मात्र कानाडोळा करायचा हेच भाजपचे आजपर्यंतचे धोरण राहिले आहे. या सावत्र वागणुकीचे उत्तर शेतकरी मतपेटीतून नक्की देईल, असेही जयंत पाटील म्हणाले. 

कांदा निर्यातबंदीचा प्रश्न अनेक महिने चिघळलेलाकेंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यापासून हा प्रश्न अनेक महिने चिघळलेला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये व्यापारी कांदा खरेदीस नकार देत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरीही हैराण आहेत. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत दुजाभाव कशासाठी?महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी असा काय गुन्हा केला आहे की, मोदी सरकारकडून त्यांच्यासोबत दुजाभाव सुरू आहे? गुजरातमधील शेतकरी तुपाशी आणि महाराष्ट्रातील शेतकरी मात्र उपाशी... हाच अन्याय गेली दहा वर्षे सुरू आहे.    - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते 

टॅग्स :madha-pcमाढाSharad Pawarशरद पवारonionकांदाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४