Join us  

'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 11:38 AM

'पंचायत 3' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये बनराकस आणि प्रधान यांच्यात रंगणारी निवडणुक पाहायला मिळणार आहे

गेल्या अनेक दिवसांपासून 'पंचायत 3' ची सर्वांना उत्सुकता आहे. 'पंचायत 3' ही यावर्षीची भारतातील बहुप्रतिक्षित वेबसिरीज म्हणून ओळखली जातेय. या सिरीजचे मागचे दोन्ही सीझन चांगलेच गाजले. सर्वांच्या अभिनयाचंही कौतुक झालं. अशातच नुकतंच 'पंचायत 3' चा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये फुलेरा गावात निवडणुकांचं वातावरण पाहायला मिळत आहे. यात बनराकस म्हणजेच भूषण आणि प्रधानजी यांच्यात निवडणुक रंगणार असं दिसतंय. 

'पंचायत 3'च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं की, सचिवजींची आदल्या सीझनमध्ये ट्रान्सफर झालेली दिसली. त्यामुळे गावात नवा सचिव येतो. तो प्रधानजींना फोन करतो पण प्रधानजी फोन कट करतात. पुढे पुन्हा एकदा सचिवजी अर्थात अभिषेक त्रिपाठी फुलेरा गावचा सचिवजी बनून गावात येतो. त्याची आणि रिंकीची मैत्री वाढताना दिसते. पुढे फुलेरामध्ये पंचायतच्या निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलेलं असतं. 

या निवडणुकीत प्रधानजींची पत्नी मंजू देवी आणि बनराकस म्हणजेच भूषण पंचायतच्या निवडणुकीला उभा राहतो. भूषण विरुद्ध मंजू देवी ही निवडणुकीची लढत बघायला मिळते. पुढे आधीच्या सीझनमध्ये ज्या विधायकाला फुलेरामधून हाकलवण्यात आलं, त्याच्याकडे शांती प्रस्ताव घेऊन जाण्याची गोष्ट पुढे येते. पुढे काय होणार याची रंगतदार गोष्ट 'पंचायत 3' मध्ये बघायला मिळणार आहे. २८ मेला 'पंचायत 3' प्राईम व्हिडीओवर बघायला मिळेल. 

टॅग्स :मराठीपंचायत समितीअ‍ॅमेझॉन