महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस; विदर्भातील चार जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 07:25 PM2020-07-09T19:25:18+5:302020-07-09T19:28:42+5:30

कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी राज्यातील अनेक तालुक्यात पावसाने ओढ दिलेली आहे..

Low rainfall in four districts of Vidarbha; 18 percent plus rain in the maharashtra | महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस; विदर्भातील चार जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस; विदर्भातील चार जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देमध्य महाराष्ट्र ३२, मराठवाड्यात ४६ टक्के अधिक पाऊस

पुणे : राज्यात गेल्या चार दिवसात पडलेल्या पावसाने कोकणातील अनेक जिल्ह्यांमधील सरासरी भरुन निघाली असून विदर्भात सरासरीइतका पाऊस झाला असला तरी चार जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के तर मराठवाड्यात ४६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. कोकणात १८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मॉन्सूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी आता मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली दिसून येत आहे. 

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सरासरीच्या -२९ टक्के, यवतमाळ -२१, अकोला - १८, वर्धा -४ टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भातील वाशिममध्ये सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पाऊस झाला आहे. 

मध्य महाराष्ट्रातील  नंदुरबार जिल्ह्यात -१४ आणि सातारा जिल्ह्यात - ५ टक्के कमी पाऊस झाला आहे. 

दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाºया सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक ८९ टक्के, अहमदनगरमध्ये ८५ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्यामध्ये :  पालघर -१० टक्के, नंदुरबार - १४ टक्के, रायगड -१ टक्का, भंडारा -१, वर्धा -४ टक्के

सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेल्यामध्ये मुंबई शहर २५ टक्के,  रत्नागिरी २१ टक्के, सिंधुदुर्ग ४३ टक्के, मुंबई उपनगर २८, ठाणे १७ टक्के, धुळे ३३ टक्के, जळगाव ३७ टक्के, कोल्हापूर २० टक्के,  नाशिक ३२ टक्के, पुणे ३५ टक्के, सांगली २१ टक्के, सातारा -५ टक्के, सोलापूर ८९ टक्के, औरंगाबाद ७९ टक्के, बीड ७७ टक्के, हिंगोली १७ टक्के, जालना ५९ टक्के, लातूर ५८ टक्के, नांदेड १६ टक्के, उस्मानाबाद १५ टक्के, परभणी ४४ टक्के, अमरावती ५ टक्के, चंद्रपूर ४ टक्के, बुलढाणा २७ टक्के,  नागपूर ९ टक्के अधिक पाऊस झाला आहे़ 

 

विभाग          सरासरी पाऊस   प्रत्यक्षात पडलेला पाऊस  टक्केवारी

कोकण            ११८६                  १२०१                        १८

मध्य महाराष्ट्र      २२७                   ३०१                          ३२

मराठवाडा         १८६                   २७२                         ४६

विदर्भ               २५४                   २५४                           ०

महाराष्ट्र             ३०३                  ३६४                          २०

Web Title: Low rainfall in four districts of Vidarbha; 18 percent plus rain in the maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.