शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात नुकसान; बस जप्तचे आदेश

By admin | Updated: October 14, 2014 23:25 IST

वाहन अपघात खटल्यातील ही पहिलीच घटना ठरली.हुबळी आगाराची बस : न्यायालयाचे आदेश

इस्लामपूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येलूर (ता. वाळवा) नजीक एकास ठोकरुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी येथील न्यायालयाने नुकसानभरपाई देण्याचा आदेश कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या हुबळी आगारास दिला होता. मात्र नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने येथील न्यायालयाने आज (मंगळवारी) या आगाराची एसटी बस जप्त करण्याची कारवाई केली. बस जप्त करण्याची वाहन अपघात खटल्यातील ही पहिलीच घटना ठरली.अडीच वर्षांपूर्वी ४ जून २०१२ रोजी हुबळी आगाराच्या एसटी बसने (क्र. केए २६ एफ ८३८) गुलजार बापूसाहेब ढगे यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. मुसा ढगे यांनी कुरळप पोलिसांत वर्दी दिली होती. पोलिसांनी एसटी बस चालकाविरुध्द गुन्हा नोंद केला होता.या अपघाताची सुनावणी इस्लामपूरच्या न्यायालयात सुरु होती. सुनावणीदरम्यान हुबळी आगाराला नुकसान भरपाई म्हणून ५० हजार ८८० रुपये भरण्याची नोटीस बजावली होती. मात्र आगाराने ही नुकसानभरपाई भरली नव्हती. त्यामुळे फिर्यादीतर्फे अ‍ॅड. एस. आर. पाटील-ढवळीकर यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यावर, आजच न्यायालयाने हुबळी आगाराची बस जप्तीचे आदेश काढले. न्यायालयातील बेलिफांनी पेठनाका येथे थांबून हुबळी आगाराची बस (क्र. केए २५ एफ ३०२४) जप्त केली. (वार्ताहर)