शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019: कधी पेपरात फोटो येईल सांगता येत नाही; जवानाच्या वाक्यानं विकी कौशलच्या अंगावर आला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:59 IST

विकी कौशलचा पाथ-ब्रेकिंग पर्फॉमर ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मान

मुंबई: उरी चित्रपटातील दमदार अभिनयामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या विकी कौशलचा लोकमतकडून गौरव करण्यात आला. पाथ-ब्रेकिंग पर्फॉमर ऑफ द इयर या पुरस्कारानं विकीचा सन्मान करण्यात आला. यावेळी विकी लष्कराबद्दल भरभरुन आला. लष्कराचा गणवेश घातल्यानंतर पाठीचा कणा आपोआप ताठ होतो, अशी भावना त्यानं व्यक्त केली. यावेळी विकानं पुरस्कारासाठी लोकमतचे आभारही मानले.उरी चित्रपटासाठी माझी निवड झाली, त्यावेळी लष्करी कवायत करावी लागेल, असं मला वाटलं होतं. सहा-सात महिने मी कवायतदेखील केली. भारतीय लष्कराचा गणवेश घातल्यावर मला जबाबदारीची जाणीव झाली, अशी गणवेशाची जादू विकीनं उपस्थितांना सांगितली. लष्कराचा गणवेश घातल्यावर पाठीचा कणा आपोआप ताठ झाला, या विकीच्या वाक्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा अक्षरश: कडकडाट केला. उरीच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा विकीनं यावेळी सांगितला. 'पटियाला कॅम्प रेजिमेंटमध्ये चित्रीकरण होतं. तेव्हा हाथी रेजिमेंटचे जवान होते. पहाटे पाच वाजता उठायच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सकाळी ड्रील होतं. मला पळायचं होतं. त्यावेळी मी एका 26 वर्षांच्या जवानाशी बोलतो होतो. बोलता बोलता तो जवान म्हणाला, आम्हाला माहीत नाही की कधी उद्याच्या वृत्तपत्रामध्ये आमचा फोटो छापून येईल. विशेष म्हणजे हे वाक्य त्या जवानानं खूप गर्वानं उच्चारलं,' अशी आठवण विकीनं सांगताच उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर विकीनं उपस्थितांशी मराठीत संवाद साधला. 'मराठी माझी मातृभाषा नाही. पण दहावीपर्यंत मराठी शिकलो आहे. त्यामुळे चुकभूल माफ असावी. मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असं विकी कौशलनं सांगितलं. यावेळी त्यानं पुलवामातील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर देशात निर्माण झालेलं संतापाचं वातावरण यावरही भाष्य केलं. 'त्या हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले. तेव्हापासून आपल्याच घरातलं कुणीतरी सोडून गेल्यासारखं वाटतं आहे. मनात दु:खासोबत आक्रोश आहे. लोक प्रचंड संतापले आहेत. त्यांना धडा शिकवा, अशा भावना व्यक्त होत आहेत. असं करा, तसं करा म्हणणारे खूप आहेत. मात्र घरी बसून हे बोलणं फार सोपं आहे. लष्करातील मंडळी त्यांचे निर्णय घेत आहेत. या परिस्थितीत एकजूट दाखवण्याची गरज आहे,' असं विकी म्हणाला.

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Vicky Kaushalविकी कौशलUri MovieउरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला