शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड : राज्यातील कर्तृत्वसूर्यांच्या कौतुक सोहळ्याने उजळला राजभवनातील दरबार हॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 09:35 IST

पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा होत होती आणि दिग्गजांनी भरलेल्या सभागृहातील टाळ्यांचा कडकडाट समुद्राच्या गाजेला टक्कर देत होता...

मुंबई : राजभवनाच्या दरबार हॉलच्या पायाशी रुंजी घालणाऱ्या खळाळत्या सागराला आणि त्या अथांगतेत मिसळून जाण्यास आतूर सूर्यगोलास साक्षी ठेवत बुधवारी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने सूर्यासारखे तळपणाऱ्या मान्यवरांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते २०२५ सालाचे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा होत होती आणि दिग्गजांनी भरलेल्या सभागृहातील टाळ्यांचा कडकडाट समुद्राच्या गाजेला टक्कर देत होता.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिश्कील शैलीत प्रश्न विचारून केलेली गोलंदाजी आणि त्यावर विक्रमवीर क्रिकेटपटूसारखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली बॅटिंग या मुलाखतीने श्रोत्यांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. ‘बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी आपल्या परखड व स्पष्ट विचारसरणीचे दर्शन ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादक संचालक ऋषी दर्डा यांनी घेतलेल्या थेट व लक्ष्यवेधी मुलाखतीत घडवले. अभिनेते कार्तिक आर्यन यांची उपस्थिती आकर्षणाचा केंद्रबिंदू होती तर बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे स्वामी ब्रह्मविहारी दास यांचे विचार श्रोत्यांना अंतर्मुख करणारे ठरले. 

लोकमत मीडिया समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. लोकमत मीडिया समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले. मोस्ट पॉवरफूल पॉलिटिशियन पुरस्काराने गौरवित झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ‘लोकमत’च्या या पुरस्कारांचे कौतुक केले. ज्युरी सदस्य राहिलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘लोकमत’चे पुरस्कार देताना किती बारकाईने छाननी केली जाते, याची सविस्तर माहिती दिली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय भूमिकेचे कौतुक करतानाच माध्यमांनी विकासाच्या मुद्द्यावर सरकारची पाठराखण करण्याचा आग्रह धरला.

क्षणचित्रेपुरस्कार सोहळ्याला उद्योग, राजकारण, प्रशासन, शिक्षण, अभिनय आदी क्षेत्रांतील अनेक मान्यवरांचीउपस्थिती होती.कार्यक्रमाचे अत्यंत नीटनेटके सूत्रसंचालन अभिनेता पुष्कर श्रोत्रीयांनी केले.कन्या आदिती तटकरे यांचे कौतुक पाहण्याकरिता वडील सुनील तटकरे कुटुंबासह हजर होते.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, बँकर व गायिका अमृता फडणवीस सोहळ्याला आवर्जून उपस्थित होत्या.शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतल्याने महाराष्ट्राला नवा मुलाखतकार मिळाल्याचा उल्लेख अनेकांनी केला.

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025MumbaiमुंबईLokmat Eventलोकमत इव्हेंट