शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह म्हणजे विकास मोहिमेचा भाग - नितिन गडकरी

By admin | Updated: September 13, 2016 16:59 IST

लोकमतने नेहमीच स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रीत केलं असून त्या मांडल्या जातात. हे चर्चासत्र लोकमतच्या विकास मिशनचा एक भाग आहे असे कौतुकाद्गार नितिन गडकरी यांनी काढले आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 -  लोकमतने नेहमीच स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रीत केलं असून त्या मांडल्या जातात. हे चर्चासत्र लोकमतच्या विकास मिशनचा एक भाग आहे असे कौतुकाद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ चर्चासत्राबद्दल बोलताना काढले आहेत. देशासाठी आणि राज्यासाठी भविष्यातील वेळ महत्वाची आहे. रस्ते, जलवाहतूक आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने हे चर्चासत्र नवा दृष्टीकोन देण्यास मदत करेल. तज्ञ आपला दृष्टीकोन समोर ठेवण्यात येणार आहेत जे महाराष्ट्रासाठी फायद्याचं ठरेल असं नितिन गडकरी बोलले आहेत.
 
राज्यातील पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती व भविष्यातील नियोजनाचा वेध घेण्यासाठी  ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’चं आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील हॉटेल ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये या कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आलं आहे. 
 
‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’मध्ये रस्ते, जलवाहतूक आणि राज्यातील पायाभूत सुविधा या विषयांवर सविस्तर आणि उद्बोधक चर्चा होत आहे. त्यातून राज्याच्या व देशाच्या प्रगतीला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासाची दिशा स्पष्ट होईल. देशभरातील रस्ते-महामार्ग, बंदरे आणि जहाज वाहतूक आणि व्हिजन महाराष्ट्र अशा तीन विषयांवर मंथन होणार असून दिवसभर ही चर्चा चालणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
रस्ते विकासाच्या चर्चासत्रात ‘येस बँक’चे संजय पालवे, ‘एल अ‍ॅण्ड टी फायनान्स लिमिटेड’चे वाय.एम. देवस्थळी, ‘एनएचएआय’चे राघव चंद्रा, ‘एमईपी इन्फ्रा’चे जयंत म्हैसकर, ‘टॉप वर्थ’चे अभय लोढा यांचा समावेश असेल.
 
बंदर विकासाच्या चर्चासत्रात येस बँकेचे विनोद बहेती, मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया, केंद्र सरकारचे प्रतिनिधी आर. के. अगरवाल, ‘इनलॅण्ड वॉटरवेज’चे परवीर पांडे, ‘जेएनपीटी’चे नीरज बन्सल यांचा सहभाग असेल. राज्यातील पायाभूत सुविधा आणि व्हिजन महाराष्ट्र या चर्चासत्रात ‘एमआयडीसी’चे संजय सेठी, ‘सिडको’चे भूषण गगराणी, ‘एमएमआरडीए’चे यू. पी. एस. मदान, ‘एमएसआरडीसी’चे आर. एल. मोपलवार, ‘मुंबई मेट्रो-३’च्या अश्विनी भिडे, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी मिलिंद म्हैसकर या तज्ज्ञांचा समावेश असेल. तिन्ही सत्रांनंतर प्रश्नोत्तरांचे सत्रही होईल. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.